Pune PMC News | नव्याने केलेल्या रस्त्यांवरील खड्डे संबधित ठेकेदारांकडूनच दुरूस्त करून घेणार; या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासून ठेकेदारांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहनचालक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने कडक पावले उचलायला सुरूवात केली आहे. रस्ते केंव्हा तयार करण्यात आले, त्यांचा लायबिलिटी पिरियड, पाईपलाईनसह सेवावाहीन्यांसाठी खोदाई केल्यानंतर रिईन्स्टेटमेंट केल्याचा कालावधी याची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे. लायबिलिटी पिरियडपुर्वी खड्डे पडलेल्या रस्त्यांवरील दुरूस्ती संबधित ठेकेदारांकडून तातडीने करून घेण्यात येणार आहेत. (Pune PMC News)

 

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरश; चाळण झाली आहे. चोवीस तास पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, एटीएमएस सिस्टिमच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई करण्यात आल्याने शहरातील रस्ते खड्डयांत गेले आहेत. मागील आठ दिवसांत ५०० हून अधिक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर खड्डे बुजवायची मोहीम हाती घेतली आहे. परंतू संततधार सुरू असल्याने अडचणी येत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात येत आहे. स्वत: महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत. (Pune PMC News)

 

यासंदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr. Kunal Khemnar) यांनी सांगितले,
की मागील तीन वर्षात नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांची एकत्रित यादी तयार करण्याचे आदेश पथ
विभागासह पाचही विभागीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत. यापैकी जे रस्ते लायबिलिटी पिरियडमध्ये आहेत,
त्यावर खड्डे आढळल्यास ते संबधित ठेकेदाराकडूनच दुरूस्त करून घेण्यात येणार आहेत.
तसेच पाईपलाईन, ड्रेनेज लाईन व अन्य सेवा वाहीन्यांची कामे केल्यानंतर दुरूस्त करण्यात
आलेल्या रस्त्यांवर खड्डे आढळल्यास दुरूस्तीचे काम करणार्‍या ठेकेदारांकडुनच खड्डयांची दुरूस्ती करून घेण्यात येणार आहे.
हे करत असताना रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाण पाहून त्या ठेकेदाराच्या कामांची पुर्नतपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

 

Web Title :- Pune PMC News | Potholes on newly made roads will be repaired only by the concerned contractors; Action will be taken against the contractors by checking the quality of these road works

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | पुण्यातील कात्रज घाटात दरड कोसळली; 15 दिवसातील तिसरी घटना

 

Pune Crime | 10 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

 

Belly Fat कमी करण्यासाठी खा ‘हे’ 5 फूड्स, नॅचरल पद्धतीने कमी करा पोटाची चरबी; जाणून घ्या