Pune PMC News | विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने सुरक्षितरित्या शाळेत जाता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने आयोजित ‘सेफ स्कूल’ स्पर्धेत सहभागी आठ प्रोजेक्टस्चे शुक्रवारी सादरीकरण

अंतिम तीन प्रोजेक्टस्ची डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करणार

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शालेय विद्यार्थ्यांना घराजवळील शाळांमध्ये सुरक्षितरित्या चालत अथवा सायकलवर जाता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने ‘सेफ स्कूल’ या रोड सेफ्टीवर आधारीत प्रोजेक्टची (संकल्पना) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी शहरातील सात झोनमधून आठ स्पर्धकांनी त्यांच्या संकल्पना महापालिकेकडे सादर केल्या असून उद्या (शुक्रवारी) याचे सादरीकरण केले जाणार आहे. यातून तीन संकल्पनांची निवड केली जाणार असून डिसेंबरमध्ये त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे ट्रॅफिक प्लॅनर निखिल मिजार (Nikhil Mijar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

शहरातील असुरक्षित वाहतुकीमुळे बहुतांश पालक हे विद्यार्थ्यांना घरापासून जवळपास असलेल्या शाळांतही पायी अथवा सायकलवर पाठविण्यास धजावत नाहीत. बहुतांश शालेय विद्यार्थी स्कूल व्हॅन अथवा बसनेच प्रवास करतात. त्यामुळे सायकल अथवा पायी शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत असून पुढील पिढी देखिल आपण वाहन वापरासाठी तयार करत आहोत. पर्यावरणदृष्टया वाहनांचा वापर मर्यादीत व्हावा यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलवर शाळेत जाता यावे यासाठी सुरक्षित रस्ते, पदपथ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रगत देशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी असे झोन करण्यात आले आहेत. या संकल्पनेवर आधारीत उपक्रम पुण्यातही राबविण्यासाठी महापालिकेने शहराचे शाळा बहुल भागातील ९ झोन तयार करून वाहतुकीच्या दृष्टीने ‘सेफ स्कूल’ या संकल्पनेवर आधारीत स्पर्धा आयोजित केली होती. (Pune PMC News)

या स्पर्धेमध्ये ७ झोनमधून ८ स्पर्धकांनी त्यांचे प्रोजेक्टस तयार करून महापालिकेकडे दिले आहेत. शुक्रवारी या प्रोजेक्टस्चे अधिकार्‍यांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून तीन अंतिम प्रोजेक्टस् निवडले जाणार असून त्यांना बक्षिसही दिले जाणार आहे. अंतिम तीन स्पर्धकांच्या प्रोजेक्टस्ची डिसेंबरमध्ये संबधित झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन आणि स्थानीक नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाईल. त्यांच्याही सूचना घेउन अंतिम प्रोजेक्ट तयार करून त्याची ‘सेफ स्कूल’ या उपक्रमाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येईल, असे मिजार यांनी नमूद केले.

 

झोनची निवड अशी केली

शाळांची संख्या आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांची घनता, अस्तित्वातील रस्ते, पदपथ यांचा विचार करून स्पर्धेसाठी झोन निश्‍चित करण्यात आले.

या झोनमधून प्रस्ताव आले

खराडी, लोहगाव-धानोरी, कोंढवा, पर्वती-बिबवेवाडी, वडगाव बुद्रुक, कोथरुड, डेक्कन जिमखाना – शिवाजीनगर.
(पाषाण आणि हडपसर झोनमधून एकही प्रोजेक्ट आला नाही.)

 

शाळांच्या परिसरातील तीन ते चार कि.मी. परिसरातील रस्ते व पदपथांवर विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळेत प्राधान्य, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी सुरक्षिततेसाठी चिन्हांचे फलक, या परिसरातील रस्त्यांवरील अन्य वाहनांसाठी वेग मर्यादा, सायकल, स्कूल व्हॅन पार्किंगसाठी पुरेशी जागा, आवश्यक तेेथे पादचारी क्रॉसिंग अशा विविध उपाययोजना करून ‘सेफ स्कूल’ प्रोजेक्टची प्रायोगीक तत्वावरील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Presentation of eight projects participating in the
‘Safe School’ competition organized by the Municipal Corporation today to enable
students to go to school safely on foot or by bicycle.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा