Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | बांधकामांसाठी अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देताना आकारण्यात येणारे फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस पाठोपाठ फायर प्रिमियम चार्जेस बंद झाल्याने सक्षम अग्निशमन सेवा देणे अवघड जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या अधिकारामध्ये अग्निशमन सेवा फीमध्ये वाढ करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव अग्निशामक दलाने मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. (Pune PMC News)

 

शहरातील बांधकामांना अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र देताना इमारतींची उंची आणि वापरानुसार अग्निशामक दल फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, फायर प्रिमिअम चार्जेस तसेच सेवा शुल्क आकारत असे. परंतू यापैकी सेवा शुल्क वगळता अन्य दोन्ही चार्जेस बंद करण्यात आले आहे. तसेच अनेक वर्षात सेवा शुल्कात वाढ केली नसल्याने अग्निशामक दलाकडून मिळणारे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण कैकपटीने वाढले आहे. फायर प्रिमिअम चार्जेस रद्द करू नये यासाठी प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्याला यश न आल्याने प्रशासनाने महापालिका आयुक्तांच्या अधिकारामध्ये सेवा शुल्क वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाच्या मंजुरी मिळेपर्यंत नवीन दराने आकारणी करण्यात येईल. (Pune PMC News)

 

शासनाच्या मंजुरीनंतर सेवा शुल्काचा दर कमी झाल्यास अधिकची रक्कम बांधकाम विभागास भरावयाच्या
रकमेमध्ये समायोजीत करण्यास आणि दरवाढ झाल्यास वाढीव रक्कम तत्काळ भरणार अशा आशयाचे
हमीपत्र विकसकाकडून लिहून घेण्याबाबतही प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Proposal for increase in fire service fee before Standing Committee for approval pune municipal corporation pmc news

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, DA बाबत सरकारने ऐकवली वाईट बातमी

Old Pension Scheme | ६५ लाख पेन्शनर्ससाठी खुशखबर! सरकारने दिली मंजूरी, ‘या’ तारखेपासून जास्त येईल पेन्शन