Pune PMC News | पुणे महानगरपालिका : बीपी (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार मोफत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | बदलत जाणारी लाईफस्टाईल (Lifestyle) आणि कोरोना संसर्गानंतर (Corona) युवकांमध्ये बीपी High BP (उच्च रक्तदाब – High Blood Pressure) आणि शुगर Sugar (मधुमेह – Diabetes ) आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यापार्श्वभुमीवर पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) या 2 आजारांवरील जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार असून याबाबतचा प्रस्ताव पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) स्थायी समितीपुढे मंजुरीकरिता ठेवण्यात आला आहे. (Pune PMC News)

पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात तर शहरी गरीब योजनेअंतर्गत (Shahari Garib Yojana ) अनेक आजारांवर उपचार देखील केले जातात. पुणेकरांना या योजनेचा चांगला फायदा होतो. मात्र, असांसर्गिक आजारांमधील बीपी आणि शुगर असे आजार असणार्‍या रूग्णांची संख्या कोरोनानंतर झपाटयाने वाढत आहे. एवढेच नव्हे तर काही कुटुंबामध्ये 3 ते 4 रूग्ण आढळतात. त्यामधील काही रूग्णांना आनुवंशिक मधुमेह (शुगर) असतो. त्यांचा महिन्याकाठी मोठा खर्च औषधांवर होतो. काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या असांसर्गिक आजारांवरील औषधे मोफत देण्यात येतात. त्याच पार्श्वभुमीवर आता पुणे महानगरपालिकेने सुध्दा बीपी आणि शुगर यांच्यावरील औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातून 45 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून मनपा देखील यासाठी निधीची आर्थिक तरतूद करणार आहे. (Pune PMC News)

यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjiv Vavare) म्हणाले,
पुणे महानगरपालिका यावर्षीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरील जेनेरिक औषधे मनपाच्या रूग्णालयांमध्ये
उपलब्ध करून देणार आहेत. त्यामध्ये शुगर आणि बीपीसाठी 6 प्रकारची औषधे असणार आहेत.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीला पाठविला आहे.

Web Title :-  Pune PMC News | Pune Municipal Corporation: 6 types of medicines for BP (high blood pressure), sugar (diabetes) will be available free of cost

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – चाकू दाखवून केला घाबरविण्याचा प्रयत्न; तोच चाकू खुपसून केला खून

Police Suspended | मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – घरगुती भांडणातून सूनेसह पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल