
Pune PMC News | पुणे महापालिकेचा अजब कारभार, करार न करताच चार्जिंग स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पर्यावरणपूरक ई-वाहनांसाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) ई-चार्जिंग स्थानके (E-Charging Station) उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी 82 ठिकाणी चार्जिगं स्थानके उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु त्याबाबतचा करार पालिकेने ठेकेदारासोबत केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतरही हव्या त्या मोक्याच्या जागा पालिकेकडून (Pune PMC News) ठेकेदाराला देण्याचा घाट घातला आहे.
पुणे शहरातील ई-वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे धोरण महापालिकेकडून स्विकारण्यात आले आहे. त्यानुसार शहरामध्ये विविध ठिकाणी 82 चार्जिंग स्थानके उभारली जाणार आहेत. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेने संबंधित ठेकेदाराला कार्य आदेशही दिला आहे. मात्र प्रस्तावानुसार करार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही मोक्याच्या जागा ठेकेदाराला देण्याचा घाट पालिका घालत आहे.
उद्यान, क्षेत्रीय कार्य़ालय, नाट्यगृह, रुग्णालय, वाहनतळ याठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत.
यासाठी पालिकेने निविदा काढली होती. या निविदेमध्ये संबंधित कंपनीला मोक्याच्या जागा आठ वर्षांसाठी
विनामूल्य वापरता येणार आहेत. ठेकेदाराला मिळणाऱ्या नफ्यापैकी 50 टक्के हिस्सा महापालिकेला (Pune PMC News)
मिळणार आहे. चार्जिंगसाठी यंत्रसामग्री, मोबाईल अॅप्लिकेशन, वीज मीटर घेणे, विद्युत देयकाची रक्कम भरणे,
चार्जिंग स्थानके सुरु ठेवणे, अशा अटी आहेत. याशिवाय ठेकेदाराकडून महापालिकेकडे 25 लाख रुपये बँक हमी घेणे
यासह इतर अटी आहेत. मात्र, बँक हमी न घेताच ठेकेदारासाठी जागा शोधल्या जात आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update