Pune PMC News | पुणे महापालिका मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर आणि कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर झाले सह महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेचे खातेप्रमुख म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या परंतू बढतीची संधी नसलेल्या दोन अधिकार्‍यांच्या पदाचे नामाभिधान ‘सह महापालिका आयुक्त’ असा करण्यात आला आहे. हे दोन्ही अधिकारी सह महापालिका आयुक्त समकक्ष समजण्यात येणार असून त्यांना सह महापालिका आयुक्तांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात येणार आहे. (Pune PMC News)

 

मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर आणि मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर अशी त्या दोन अधिकार्‍यांची नावे आहेत. महापालिकेमध्ये यापुर्वी सुरेश जगताप, ज्ञानेश्‍वर मोळक आणि विलास कानडे हे सह महापालिका आयुक्त होते. परंतू जगताप आणि मोळक हे अतिरिक्त आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर विलास कानडे यांची नुकतेच अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कळसकर आणि दौंडकर हे दोघांच्या पदामागे सह महापालिका आयुक्त असे नामाभिधान लागणार आहे. विधी समितीच्या माध्यमांतून लवकरच सर्व साधारण सभेपुढे यासंदर्भातील विषयपत्र येणार आहे. (Pune PMC News)

महापालिकेच्या प्रशासनाकडील खातेप्रमुख संवर्गातील पदावर सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांना बढतीची संधी नाही. या अधिकार्‍यांच्या हुद्दा अधिनियमात हुद्दा नमुद केल्यामुळे त्यांना सह महापालिका आयुक्त समकक्ष समजण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभा आणि शासनाच्या मान्यतेनुसारच हे नामाभिधान करण्यात येत असून या दोन्ही अधिकार्‍यांना सह महापालिका आयुक्तांना देण्यात येणारे सर्व फायदे व मान्य दराने विशेष वेतन देण्यात येणार आहे. या अधिकार्‍यांचे पदनाम बदलले तरी त्यांना पुर्वीच्याच हुद्यावरच व त्याच अधिकारानुसार काम करावे लागणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation Chief Accounts Officer
Ulka Kalaskar and Labor Advisor Shivaji Daundkar became Municipal Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा