Pune PMC News | पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र राऊत आणि आयुक्तांचे मुख्य सचिव गजानन कडक सेवानिवृत्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राऊत (Rajendra Raut PMC) आणि महापालिका आयुक्त कार्यालयातील मुख्य सचिव गजानन कडक (Gajanan Kadak PMC) हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. शुक्रवारी महापालिकेमध्ये महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित समारंभात राऊत आणि कडक यांच्यासह ३१ जुलै रोजी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान करून निरोप देण्यात आला. (Pune PMC News)

 

राजेंद्र राऊत हे १९८८ मध्ये महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. मितभाषी आणि सचोटीने काम करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राऊत यांनी पदोन्नतीचे टप्पे गाठताना भूमी प्रापण, बांधकाम, पथ, भवन अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय काम केले. शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे गतीने केलेले काम, शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा, महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम, महापालिकेच्या जुन्या सभागृहाचे नूतनीकरण, घोरे रोड क्षेत्रिय कार्यालयाची उभारणी, सावरकर भवन, औंध वॉर्ड ऑफीस, बिबवेवाडी वॉर्ड ऑफीस, नेहरू स्टेडीयमधील कॉन्फरन्स रुमची कामे राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. (Pune PMC News)

गजानन कडक हे १९८७ मध्ये लघु टंकलेखक या पदावर महापालिका सेवेत रुजू झाले.
यानंतर पदोन्नती होत असताना त्यांनी सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त कार्यालयात लघुलेखक म्हणून काम पाहीले.
येथून पदोन्नती झाल्यानंतर महापालिका आयुक्त कार्यालयात त्यांची आयुक्तांचे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली.
३६ वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांनी तब्बल २१ आयएएस अधिकार्‍यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सेवा बजावली.
सेवानिवृत्तीच्या वेळी यापैकी बहुतांश आयएएस अधिकार्‍यांनी कडक यांना फोनवरून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation Chief Engineer Rajendra Raut and Commissioner Chief Secretary Gajanan Kadak retired

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 

MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा

 

Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर