Pune PMC News | JM व FC रोडवरील पावसाचे पाणी अडवण्यासाठी पालिका आयुक्तांची नवीन शक्कल !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहराला आता पावसाळ्याचे (Monsoon) वेध लागलेले असून पालिका आयुक्त स्वत: जाऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी करताना दिसत आहेत. मागील वर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे पुणे शहर देखील मुंबईप्रमाणे (Mumbai) तुंबलेले होते. त्यामुळे यावर्षी काही नव्या उपाययोजना पालिकेमार्फेत राबविल्या जात आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये शहरातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता (FC Road) आणि जंगली महाराज रस्त्यावर (JM Road) मोठ्या प्रमाणात पाणी साचते. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी या पाण्याला अडवण्यासाठी फर्ग्युसन मागील टेकडीवरून वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावर येण्याआधीच कॉलेजच्या आवारातील विहिरींमध्ये आणि खाणीमध्ये अडविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. (Pune PMC News)

 

सोमवारी आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकाऱ्यांसोबत फर्ग्युसन रस्ता, त्यामागील टेकडी, तसेच जंगली महाराज रस्त्यावर पाणी साठणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. फर्ग्युसनमागील टेकडीवरून वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावर येण्यापूर्वी कॉलेजच्या आवारातील विहिरींमध्ये येईल, अशी व्यवस्था करण्यात यावी अशी नवीन उपाययोजना सुचविल्या आहेत. सध्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या खाणीमधील गाळ काढून पाणी साठवण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

पुण्यातील वाहनांची वर्दळ असलेला जंगली महाराज रस्त्यावर चालू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे (Metro Work) तसेच पदपथामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण येत असून, मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठते आहे. याठिकाणी आणखी चेंबर्स (Chambers) वाढवून नवीन वाहिनी टाकण्याची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा अल्प काळासाठीची असून पावसाळ्यापूर्वी हे काम करून घेण्याचे प्रयत्न असणार आहे.

पालिका आयुक्त चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहे. पावसाळापूर्व कामांमध्ये वेळापत्रकानुसार
नियोजन करण्यात मागे पडलेल्या उपायुक्त (Deputy Commissioners) आणि
सहायक आयुक्तांनादेखील (Assistant Commissioners) कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्यात आली आहे.
पावसाळापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी तसेच पावसाळ्यातही देखरेखीसाठी क्रॉनीक स्पॉटच्या (Chronic Spot)
परिसरात अतिरिक्त अधिकारी नेमण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. (Pune PMC News)

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा