Pune PMC News | महापालिका कंत्राटी सुरक्षा रक्षक तीन महिन्यांपासून वेतनाविनाच; पालिकेतील सत्ताधार्‍यांनी नेत्याच्या कंपनीचे पुरविलेले ‘लाड’ कष्टकर्‍यांच्या मुळावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेला कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक (Security Guards On Contract Basis) पुरविणार्‍या भाजपच्या बड्या नेत्याच्या (BJP Leader) कंपनीने या सुरक्षा रक्षकांना मागील तीन महिन्यांपासून वेतनच (Salary) दिले नसल्याचे समोर आले आहे. केवळ महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या ‘दबावामुळे’ हे काम देण्यासाठी अटीशर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. दरम्यान, वेतनासंदर्भात तक्रार करूनही प्रशासन काहीच हालचाल करत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाने (Rashtriya Majdur Sangh) दिला आहे. (Pune PMC News )

 

महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्यान, कार्यालये आदी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली गेली आहे. सुमारे ३२ कोटी रुपयांचे हे कंत्राट क्रिस्टल या कंपनीला दिले गेले आहे. ही कंपनी भाजपच्या बड्या नेत्याची असून केवळ दबावापोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या कंपनीचा प्रस्ताव मंजूर केल्याचे आरोप प्रस्ताव मंजुरीच्यावेळी झाले होेते. (Pune PMC News)

 

या कंपनीच्या मार्फत पंधराशे कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व सुरक्षारक्षकांना कामगार कायदा अंतर्गत कोणतेच लाभ मिळत नाहीत असा आरोप राष्ट्रीय मजदुर संघाचे सुनील शिंदे (Rashtriya Majdur Sangh Sunil Shinde) यांनी केला आहे. याबाबत महापालिकेच्या प्रशासनाकडे (PMC Administration) अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही केली गेली नाही असे शिंदे यांनी सांगितले. या सुरक्षारक्षकांचे वेतन वेळेवर दिले जात नाही, त्यांच्या पगारात कोणतेही कारण न सांगता कपात केली जाते, पगार स्लिप देण्यात येत नाही, अशा अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत. बर्‍याचदा कोणतेही कारण न सांगता कामावरून काढून टाकले जाते. या तक्रारीसंदर्भात अनेकदा महापालिकेचे आयुक्त संबंधित अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे हे सर्व सुरक्षा रक्षक हवालदिल झाले असून त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे व लवकरच मोठे आंदोलन करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

नेत्याचे ‘लाड’ पुरविणे कर्मचार्‍यांच्या मुळावर !
महापालिकेमध्ये यापुर्वी तीन ते चार कंपन्यांकडून कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्यात येत असत. परंतू सुरक्षा रक्षक पुरविणार्‍या कंपन्यांकडून सुरक्षा रक्षकांना वेळेवर वेतन दिले जात नाही, कामगार कायद्यानुसार लाभ दिले जात नाहीत अशा तक्रारी असल्याचे कारण देत मागील सत्ताधारी भाजपने प्रशासनाच्या माध्यमातून एकाच कंपनीचा ‘लाड’ पुरविण्याचा हट्ट धरण्यात आला. यासाठी निविदेतील अटीशर्ती बदलण्यात आल्या. त्यामुळे आपोआपच पुर्वीचे ठेकेदार अपात्र ठरून भाजपच्या त्या बड्या नेत्याचे ‘लाड’ पुरविण्यात आले. परंतू आता या ‘लाड’ क्या नेत्याची कंपनीच सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवत असून कर्मचार्‍यांना अन्य लाभही देत नसल्याचे उघड झाले आहे.

 

क्रिस्टल कंपनीने (Crystal Company) कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन अद्याप दिलेले नाही. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला आहे. एप्रिल महिन्याचे वेतन पुढील दोन दिवसांत तर मे महिन्याचे वेतन १० जूनपर्यंत देण्यात येईल, असे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले आहे. तसेच अन्य आरोपांबाबतही चौकशी करण्यात येत आहे.

माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग
(Madhav Jagtap, Deputy Commissioner, Security Department)

 

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation PMC contract security guards without pay for three months

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा