Pune PMC News | पुणे महापालिकेने दहा महिन्यांत तब्बल 750 बेकायदा होर्डींग हटविले; थकबाकी असलेल्या 135 प्रकरणांत मिळकतींच्या मिळकत करावर चढविला बोजा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील बेकायदा होर्डींग्जवर मागील वर्षभरामध्ये जोरदार कारवाई करण्यात आली आहे (illegal hoardings in pune). मागील दहा महिन्यांत तब्बल ७५० बेकायदा होर्डींग्ज काढण्यात आले असून होर्डींग्जची थकबाकी असलेल्या तब्बल १३५ जणांच्या मिळकत करावर थकबाकीचा बोजा चढविण्यात आला आहे, अशी माहीती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

शहरातील होर्डींग्जबाबत आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मागील दहा महिन्यांत शहरातील तब्बल ७५० होर्डींग्ज काढण्यात आल्याची माहीती देण्यात आली आहे. महापालिकेने समाविष्ट ३४ गावांसह संपुर्ण शहराचे तीन झोन केले असून झोननिहाय होर्डींग्जचा भाडेदर ठरविण्यात आला आहे. त्यानुसार प्राईम ठिकाणी 580 रुपये दर आकारण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेने बेकायदा होर्डींग्जविरोधात कारवाईला गती दिली आहे. त्याचवेळी जी होर्डींग्ज नियमान्वीत करणे शक्य आहे, त्यांनाही संधी देण्यात आली आहे. (Pune PMC News)

 

परंतू यानंतरही जे होर्डींग्ज विहीत मुदतीत नियमान्वीत केले जात नाहीत, ते काढून टाकण्यात येत आहेत. नगररस्ता, वाघोली, मांजरी या परिसरात अशा होर्डींग्जची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. (PMC Removes Illegal banners, hoardings In Pune)

शहरातील होर्डींग्ज चालकांकडे वार्षिक भाडेदराची थकबाकी आहे.
ही थकबाकी न भरणार्‍या होर्डींग्ज मालक अथवा ज्या वास्तूंवर ही होर्डींग्ज लावण्यात आली आहेत,
त्या वास्तूच्या मिळकत करामध्ये थकबाकीचा बोजा टाकण्यात येत आहे. आतापर्यंत १३५ प्रकरणे मिळकत कर विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.
यासोबतच भाडेदर वाढविल्यानंतर ज्या होर्डींग्जसाठीचे ५० हजार रुपये डिपॉझीटही भरून घेण्यात येत आहे.
जेणेकरुन होर्डींगवर कारवाई करण्याची वेळ आल्यास खर्च या डिपॉझीटमधून वळता करणे शक्य होणार आहे.
बेकायदा होर्डींग्जवर कारवाईसाठी एक केंद्रीय पथक तयार करण्यात आले असून दररोज वेगवेगळ्या झोनमध्ये जाउन हे पथक कारवाई करत आहे.
तसेच सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून बेकायदा होर्डींगचा शोध घेण्यात येत आहे. आकाशचिन्ह विभागाला आतापर्यंत २७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
अद्याप या आर्थिक वर्षाचे शेवटचे दोन महिने राहीले असून या उत्पन्नामध्ये आणखी भर पडेल,
असा विश्‍वास विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar)
आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) उपस्थित होते.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation removed as many as 750 illegal hoardings in ten months; In 135 outstanding cases, the burden was placed on the income tax

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर