पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या महापालिकेच्या (Pune PMC News) शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे. 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये असणार्या महापालिका (Pune PMC News) हद्दीत राहाणार्या पुणेकरांचा या योजनेमध्ये समावेश केला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिली असून मुख्य सभेच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होणार आहे. रुग्ण उपचारासाठी (Patient Treatment) दाखल झाल्यानंतर पॅनलवरील संबधित रुग्णालय प्रशासनालाच शहरी गरीब कार्डची ऑनलाईन खातरजमा करून महापालिकेकडून ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या महापालिकेतील (Pune Municipal Corporation) फेर्या देखील थांबणार आहेत.
बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Online Application) करणे बंधनकारक करण्यात
आले होते. यानंतर योजनेच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचे नियोजित होते. याआधी शहरी गरीब योजनेचा
लाभ घेण्यासाठी एक लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक होते.
मात्र, योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आणि बोगस लाभार्थ्यांचे अर्ज येत असल्याने वार्षिक उत्पन्न मर्यादा
वाढवून एक लाख 60 हजार करण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार तसा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्यामुळे यापुढे 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या (State Government) महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या
(Mahatma Jyotiba Phule Health Yojana) धर्तीवर या योजनेची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आल्याचा
दावा आरोग्य विभागाने (Department of Health) केला आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ शहरी गरीब योजनेतील
लाभार्थ्यांना देण्यास पालिकेने प्राधान्य दिले आहे. राज्याच्या आरोग्य योजनेत लाभ मिळाला नाही तरच
शहरी गरीब योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहेत. यासाठी शहरात परिमंडळ स्तरावर तीन केंद्र स्थापन करण्याचे
नियोजित आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update