
Pune PMC News | रस्त्यावरील बेवारस वाहने ताबडतोब काढा अन्यथा…, पुणे महापालिकेचा वाहन मालकांना इशारा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुण्यातील गणेश मंडळांच्या गणपतींचे उद्या (गुरुवार) विसर्जन होणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन (Pune Ganpati Visarjan 2023) मिरवणुकीत अनेक मंडळे सहभागी होणार असून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बेवारस वाहनांमुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार असल्याने बेवारस वाहने ताबडतोब हटविण्यात यावीत, असे आदेश पुणे महापालिकेच्या (Pune PMC News) अतिक्रमण निर्मूलन विभागाने (Encroachment Removal Department (PMC) दिले आहेत अतिक्रमण विभागाने बेवारस वाहनांवर नोटीस चिटकवली असून ही वाहने तातडीने न हटवल्यास ती जप्त केली जातील असा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शहर,
उपनगर तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येत असतात.
त्यामुळे वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) टाळण्यासाठी मध्यवर्ती भागातील रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी पुणे महापालिकेने (Pune PMC News) रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली बेवारस वाहने हटवण्याची मोहीम हाती घेतली होती.
पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेत 22 वाहने जप्त करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला, पादचारी मार्गावर मोटारी, दुचाकी आणि तीन चाकी वाहने उभी केली आहेत. या वाहनांचा विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार असल्याने पालिकेच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या (Regional Transport Department) माध्यमातून या वाहनांच्या मालकांचा पत्ता शोधून त्यांना नोटीस बजावली आहे.
लक्ष्मी रस्ता, नाना पेठ, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने उभी करण्यात
आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहन मालकांना नोटीस पाठवून रस्त्याच्या कडेला
लावलेली वाहने हटवण्यास सांगण्यात आले आहे. वाहने न हटविल्यास ती जप्त केली जातील,
असा इशारा अतिक्रमण विभागाकडून संबंधित वाहन मालकांना दिला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा