Pune PMC News | आपत्तींशी लढण्यासाठी पुणे महापालिकेचा क्रांतीकारक निर्णय ! तब्बल 7500 चौ.फूट जागेत उभारणार अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष

GBS In Pune | The number of GBS patients is increasing in Pune, 'this' care about drinking water is necessary, municipal commissioner appeals

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला ‘अच्छे दिन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच वाढणार्‍या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सामोरे जाण्यासाठी पुणे महापालिका मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रशस्त आणि अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करणार आहे. महापालिका भवनमधील जुन्या इमारतीतील पश्‍चिम बाजूकडील दुसर्‍या मजल्यावर तब्बल सात हजार ४०० चौ.फूट जागेमध्ये हा कक्ष साकारण्यात येणार असून तीनही शिफ्टमध्ये याठिकाणी ६५ ते ७० अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महापालिकेच्या हद्दीमध्ये पावसाळ्यामध्ये मुळा, मुठा नदी आणि ओढ्यांना येणारा पूर, अनेक भागात ढगफुटीसारख्या घटनांमुळे रस्त्यांनाही पुराचे स्वरूप येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जिवित आणि वित्तहानी होते. एवढेच नव्हे तर अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीमध्ये लाखो नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. यासोबतच भूकंप व अन्य मानव निर्मित आपत्तींची देखिल सातत्याने भिती असते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आणि पोलिस प्रशासनासोबतच महापालिका प्रशासनाचेही उत्तरदायित्व महत्वाचे असते. या तीनही यंत्रणांमध्ये सर्वाधिक कस लागतो तो महापालिका प्रशासनाचा. आपत्तीच्यावेळी तातडीने यंत्रणा कार्यन्वीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक कार्यक्षम आणि सुसज्ज असावा यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी पुढाकार घेतला आहे.

सध्या महापालिका भवनमधील महापालिका आयुक्त कार्यालयाच्या वर असलेल्या चवथ्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे. याठिकाणी शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींद्वारे प्रमुख ठिकाणची लाईव्ह स्थिती पाहाण्याची सुविधा आहे. कंट्रोल रुम व अधिकारी व कर्मचार्‍यांना बसण्याची जागा आहे. अवघ्या ६४० चौ.फूट अडगळीच्या जागेत अगदी दाटीवाटीत कर्मचार्‍यांना बसावे लागते. याठिकाणी स्वच्छतागृहाची आणि लिफ्टची देखिल व्यवस्था नाही. त्यामुळे बारामहीने अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मोठी गैरसोय होते.

या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेतील दीर्घकाळ सेवेच्या अनुभवातून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व यंत्रणांनी सुसज्ज असा आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका भवनमधील जुन्या इमारतीतील पश्‍चिमेकडील विंगमधील मुख्य लेखा परीक्षक विभाग, विशेष शाखेचे उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, स्वच्छ सर्वेक्षण अभियान, बांधकाम विकास आणि विधी विभागाचे स्टोअर रुम इतरत्र हलवून या संपुर्ण मजल्यावर फक्त आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे दुरूस्तीची कामे करून इंजिनिअरींग रुम, कंट्रोल रुम, कॉन्फरन्स रुम, कन्सल्टेशन रुम, कॉम्प्युटर व सर्व्हर रुम, लायब्ररी, आठ बेडची सुविधा असलेली स्टाफ रेस्ट रुम असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी साधारण चार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच हा कक्ष ३६५ दिवस चोवीस तास सुरू ठेवण्यासाठी ६५ ते ७० अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि भवन रचना विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.

नियोजीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष असलेल्या दुसर्‍या मजल्यावरील जी कार्यालये अन्यत्र हलविण्यात येणार आहेत त्यांना सावरकर भवन, सध्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महापालिका भवन येथील तळमजल्यावरील कर आकारणी भांडार विभागाच्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

Total
0
Shares
Related Posts