Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर, 10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी

Pune PMC News | pune municipal medical college dean dr ashish banginwar has been dismissed from service

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुण्यातील गोर गरिब विद्य़ार्थ्यांना देखील वैद्यकीय शिक्षणाचे धडे घेता यावेत या उदात्त हेतूने पुणे महानगर पालिकेतर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune) स्थापना करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या (Pune PMC News) या वैद्यकीय महाविद्यालयातील डीन डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार (Dr Ashish Shrinath Banginwar) यांना लाच (Bribe Case) घेताना रंगेहात पकडण्यात आले. आता पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी डीन डॉ. आशिष बनगिनवार यांची पालिका सेवेतून हकालपट्टी केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय हे शहरातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र महाविद्यालयाचे डीन डॉ. बनगिनवार यांनी प्रवेश मिळवून देण्यासाठी 16 लाखांची लाच मागितली होती. मात्र त्यांचा हा गैरप्रकार उघड झाला आणि त्यांना रंगेहात 10 लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. यानंतर महाविद्यालयाच्या आवारामध्ये गदारोळ झालेला दिसून आला. विद्यार्थ्यांसह काही संघटनांनी याचा जाहीर निषेध करत संताप व्यक्त केला होता. मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी या पालिका वैद्यकीय कॉलेजची तोडफोड देखील केली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये पालिकेवर देखील ताशेरे ओढण्यात आले. आता पालिका आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आला असून डीन डॉ. आशिष बनगिनवार यांना पालिका सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

पुणे महापालिकेकडून बनवण्यात आलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महाविद्यालय संचलित करण्यासाठी
शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये महापौर (Pune Mayor), उपमहापौर (Pune Deputy Mayor),
स्थायी समिती अध्यक्ष (Pune Standing Committee President), सभागृह नेते (Pune Leader of the House),
विरोधी पक्षनेते, सर्व पक्षांचे नेते, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागप्रमुख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता,
शहर अभियंता, विधि सल्लागार हे ट्रस्टमध्ये होते. मात्र मागील काही वर्षांपासून पालिकेवर प्रशासकराज चालू आहे. पालिकेमध्ये सभागृह नसल्यामुळे अनेक ठिकाणी व्यवस्था राहिलेली नाही.
त्याचमुळे महाविद्यालयामध्ये असे लाचखोरीचे गैरप्रकार सुरु आहेत.
डीन डॉ. आशिष बनगिनवार यांचे लाच घेतलेल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेने (Pune PMC News)
दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील (Mahesh Patil), आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार
(Chief of Health Dr. Bhagwan Pawar), सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Sachin Ithape)
यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात आशिष बनगिनवार दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून कमी
करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

Total
0
Shares
Related Posts