Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीच बसवले बदलीचे धोरण धाब्यावर; कामाचा विभाग वेगळा आणि पगार मात्र दुसऱ्या विभागाकडून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २००४ मध्ये महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरवले. या धोरणानुसार फक्त कागदोपत्री बदली न दाखवता ती प्रत्यक्ष होणे आवश्यक आहे. मात्र, या धोरणाला संबंधित विभागाचे विभागप्रमुखच फाटा देत असल्याचा प्रकार वर्षानुवर्षे चालत असल्याची माहिती (RTI Activist) समोर आली आहे. यामुळे अधिकारी एका विभागात काम करत असून त्यांचे वेतन दुसऱ्या विभागात अशी संकल्पना महापालिकेने मान्य केली आहे. (Pune PMC News)
नुकतीच या संदर्भात माहिती अधिकारात महापालिकेतील लेखनिक प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात आली होती. या यादीप्रमाणे लेखनिक प्रवर्गातील १४५ अधिकारी आणि कर्मचारी कामाला एका विभागात आहेत. पण त्यांचे वेतन दुसऱ्या विभागाकडून होणार, या पद्धतीने काम चालू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पुणे महापालिकेत अधिक्षक पदापासून ते वरिष्ठ लेखनिक पदापर्यंतचे शेकडो कर्मचारी बदलीनंतर दुसऱ्या विभागात रुजू होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी कर्मचारी-अधिकारी बदली धोरणाकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे. (Pune PMC News)
अशा मनमानी पद्धतीने विभागप्रमुख कर्मचाऱ्यांना काम देत असतील, तर बदल्यांचे धोरण रद्द करावे; अन्यथा तरतुदीनुसार या धोरणाला ‘खो’ देणाऱ्या विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करून बदल्यांच्या धोरणाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंच (Sajag Nagrik Manch) विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
Web Title :- Pune PMC News | pune pmc employees-do-not-join-other-departments-after-transfer-in-pune-municipality
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी