Pune PMC News | Pune G20 Summit साठी सुशोभिकरणाच्या नावाखाली कोट्यवधींची विदेशी झाडे आणि कुंडयांची खरेदी; इस्टीमेट कमिटी टाळण्यासाठी निविदांचे तुकडे केल्याने खरेदी संशयाच्या भोवर्‍यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | एकिकडे नदीकाठ सुधार योजनेसाठी शेकडो विदेशी प्रजातीच्या वृक्षांची कत्तल करण्याचे नियोजन आणि दुसरीकडे जी २० च्या (Pune G20 Summit) निमित्ताने रस्ते सुशोभीकरणासाठी विदेशी प्रजातीची झाडे आणि कुंडयांच्या खरेदीसाठी एक कोटी रुपयांच्या निविदांमुळे (PMC Tender) पालिका प्रशासन (Pune PMC Administration) चर्चेत आले आहे. विशेष असे की एरव्ही एक सारख्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा मनुष्यबळासाठी एकच निविदा राबविणार्‍या महापालिका प्रशासनाने उद्यान विभागाच्यावतीने करण्यात येणार्‍या सुशोभिकरणाच्या कामासाठी निविदांचे तुकडे केले आहेत. एस्टीमेट कमिटीचा फेरा टाळण्यासाठी हे तुकडे केल्याने सुशोभीकरण संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. (Pune PMC News)

महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) उद्यान विभागाला (PMC Garden Department) जी २० साठी ३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी शहरातील पाच रस्त्यांवर खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नगर रस्ता (Pune Nagar Road), सोलापुर रस्ता (Pune Solapur Road), पाषाण रस्ता (Pashan Road), खराडी बायपास (Kharadi Bypass), बाणेर रस्ता (Baner Road) यांचा समावेश आहे. यारस्त्यांवर विद्युत राषणाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर पथ विभागाकडुन रस्ते दुरुस्ती सुरु आहे. रंगरंगोटी सुध्दा करण्यात येणार आहे. (Pune PMC News)

उद्यान विभागाकडून या पाच रस्त्यांवरील उड्डाणपुल आणि रस्त्यांवर कुड्यां ठेवण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. यापैकी एक निविदा मोठ्या आकाराच्या १७६० कुंड्या खरेदीची असून दुसरी निविदा साधारण तेवढ्याच रकमेची आणि तेवढीच सुभोभीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या विदेशी झाडे खरेदीची आहे.

 

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फॉक्सटेल प्लामची २०० झाडे किंमत १ हजार ८०० प्रतिझाड , रॅफिस प्लाम १०० झाडे प्रतिझाड ४ हजार, बोगन वेल २०० झाडे प्रतिझाड ५ हजार, फिकस स्टार लाईट २५० झाडे प्रतिनग ४ हजात, फिकस ब्लॅक २५० झाडे प्रतिनग ५ हजार, ऍरका प्लॉम २८० झाडे प्रतिनग ८०० रुपयाप्रमाणे ही झाडे खरेदी करण्यात येणार?आहेत. वस्तु आणि सेवा कर धरुन या झाडांसाठी एकुण ४९ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुणे शहरामध्ये आयोजित होणार्या जी २० बैठकीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट करणे आणि रोपे पुरवणे हे अंदाजपत्रकीय अर्थशीर्षकातून खरेदी करण्यात येणार आहे. ५० लाख रुपयांच्या कुड्या सुध्दा यासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.

महापालिकेने जी २० बैठक आणि शहरातील रस्त्यांचे कायमस्वरुपी सुशोभिकरण करण्यासाठी झाडे आणि कुंड्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. शहरातील पाच रस्त्यांवरील ७ उड्डाणपुलांवर कायमस्वरुपी सुशोभिकरण करण्यासाठी या कुंड्या ठेवण्यात येतील. ही झाडे आणि कुंड्यांचा आकार मोठा असल्यामुळे किंमत जास्त आहे. २ वर्षापासून १० वर्षांपर्यंतची ही झाडे आहेत. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर देखिल सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याठिकाणी कुंड्या ठेवण्यात आहेत. तसेच दुभाजकांवर फ्लॉवर बेडस् करण्यात येणार आहेत. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग बंद करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Municipal Commissioner Vikas Dhakne) यांनी महापालिका आयुक्तांकडे अहवाल दिला असून अंतिम पाहाणीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

– उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे

(Ashok Ghorpade, Chief Garden Superintendent PMC, Pune)
एस्टीमेट कमिटीपुढे जाणे टाळण्यासाठी उद्यान विभागाच्यावतीने जी २० परिषदेसाठीच्या एकसारख्याच कामाच्या निविदा ५० लाख रुपयांच्या आतमध्ये राहातील, असे विभाजन केले आहे. ५० लाख रुपयांच्या आतील कामे वरिष्ठ अभियंत्यांच्या अखत्यारीत तर १ कोटी पर्यंतची कामे ही विभाग प्रमुखांच्या अखत्यारीत मंजूर होतात. त्यासाठी एस्टीमेट कमिटीपुढे जाण्याची गरज नसते. उद्यान विभागाने अशा पद्धतीने तुकडे केलेल्या कामांच्या निविदां पुढीलप्रमाणे:

 

१) सोलापूर रस्त्यावरील रस्ता दुभाजक झाडांची छाटणी आणि लागवड व सुशोभिकरण करणे – ४९ लाख ७० हजार

२) पाषाण रस्ता, बाणेर रस्ता सुशोभीकरण करणे – ४९ लाख ९८ हजार

३) खराडी बायपास ते सोलापुर रस्ता सुशोभीकरण करणे – ९७ लाख १४ हजार

४) नगररोड सुशोभिकरण करणे – ९८ लाख ६५ हजार

५) जी २० साठी रोपे पुरवणे ४९ लाख ९६ हजार

६) जी २० कुंड्या पुरवणे ४९ लाख २२ हजार

Web Title :  Pune PMC News | purchase of crores worth of exotic trees and potted plants in the name
of beautification for the Pune G20 Summit; Bifurcation of tenders to
avoid estimate committee puts procurement in doubt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा