Pune PMC News | हडसपर येथील बनकर क्रिडा संकुल बांधल्यापासून 5 वर्षे बंदच ! आता दुरूस्तीसाठी 30 लाख रुपयांची निविदा

संबधितांवर कारवाई करण्याची कॉंग्रेसची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्यावतीने हडपसर (Hadapsar) येथे उभारण्यात आलेले कै. रामचंद्र अप्पा बनकर शैक्षणिक क्रिडा संकुल (Ramchandra Appa Bankar Krida Sankul) मागील पाच वर्षांपासून बंद आहे. बंद अवस्थेमुळे याठिकाणचा जलतरण तलाव (Swimming Pool) नादुरूस्त झाला असून दुरूस्तीसाठी महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) ३० लाख रुपयांची निविदा (PMC Tender) काढली आहे. याला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करून तातडीने जलतरण तलावाची दुरूस्ती करून नागरिकांसाठी सुरू करावा अशी मागणी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे (Congress OBC Cell Pune) अध्यक्ष प्रशांत सुरसे (Prashant Surse) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune PMC News)

 

सुरसे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांना निवेदन देउन ही मागणी केली आहे. महापालिकेने २०१६ मध्ये या क्रिडा संकुलाचे काम केले आहे. याठिकाणी जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल (Badminton Hall) आणि व्यायाम शाळा (Gym) बांधण्यात आली आहे. परंतू अद्यापही हे संकुल नागरिकांच्या सेवेसाठी खुले केलेले नाही. दरम्यान, वापरच न झाल्याने येथील जलतरण तलाव नादुरूस्त झाला आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी ३० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. (Pune PMC News)

सर्वसामान्य नागरिकांच्या कराच्या पैशाची ही उधळपट्टी असून संबधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच तलावाची तातडीने दुरूस्ती करून संकुल नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रा. शोएब इनामदार, पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune PMC News | Ramchandra Appa Bankar Krida Sankul at
Hudspur closed for 5 years Now PMC Tender Of 30 Lakh For Repairs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा