Pune PMC News | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेतील सर्व अडथळे दूर ! पर्यावरण प्रेमींनी केलेली याचिका एनजीटीने फेटाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेमध्ये पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाखल केलेली याचिका आज एनजीटीने फेटाळून लावली. यामुळे नदीकाठ सुधार योजनेतील अडथळे दूर झाले असून या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्‍वास महापालिका प्रशासनातील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. (Pune PMC News)

 

पुणे महापालिकेच्यावतीने शहराच्या मध्यातून वाहणार्‍या मुळा- मुठा नदी काठ सुधार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. ११ टप्प्यांमध्ये होणार्‍या या कामांमध्ये नदीच्या दोन्ही काठावरील सुमारे ४४ कि.मी. परिसरामध्ये साबरमती नदीच्या पार्श्‍वभूमीवर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नदीच्या प्रवाहाला कोणताही अडथळा न आणता दोन्ही तिरांवर रस्ते, वृक्षारोपण, सायकल ट्रॅक, उद्याने, मैदाने यांच्यासह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याप्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च आहे. थोडक्यात मरणासन्न झालेल्या नद्यांकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सुविधायुक्त सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. (Pune PMC News)

 

दरम्यान, या प्रकल्पामुळे नदी प्रवाहात अडथळे निर्माण होणार असून नैसर्गिक अधिवासही नष्ट होण्याची भिती व्यक्त केली आहे. तसेच या प्रकल्पामध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी बांधकामे करण्यात येणार असूनही चुकीची माहिती देउन महापालिकेने पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याचा आरोपही स्वंयसेवी संस्थांनी घेतला होता. याच मुद्दयावर पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती. यामध्ये महापालिकेसह, राज्य शासन आणि केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण विभागांना प्रतिवादी करण्यात आले होते.

या याचिकेवर मागील काही महिन्यांपासून न्यायाधीश दिनेशकुमार सिंह आणि डॉ. विजय कुलकर्णी यांच्या बेंचपुढे सुनावणी होती. राज्य शासन व महापालिकेच्यावतीने सिनियर कौन्सील आत्माराम नाडकर्णी आणि ऍड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली. प्रकल्पाला पर्यावरण प्रमाणपत्र घेताना प्रकल्पाचा संपुर्ण आराखडा सादर करण्यात आला होता. त्या आधारेच परवानगी देण्यात आल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एनजीटी न्यायालयाने यादवाडकर आणि कुलकर्णी यांनी केलेली याचिका रद्द करत आराखड्यामध्ये काही बदल करायचे झाल्यास या बदलांना पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी, असे बंधन घातले आहे.

 

पुण्याच्या जीनवदायीनी असलेल्या मुळा- मुठा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी महापालिका जायका नदी सुधार प्रकल्पासोबतच नदीकाठ सुधार प्रकल्पही राबवत आहे.
येत्या काही वर्षात या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
एनजीटी न्यायालयाच्या आदेशामुळे मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.

 

– प्रशांत वाघमारे (शहर अभियंता), युवराज देशमुख (अधीक्षक अभियंता, मुळा-मुठा नदीकाठसुधार प्रकल्प)

 

Web Title :- Pune PMC News | Remove all obstacles in Mula-Mutha riverbank improvement plan! The NGT rejected the petition filed by the environmentalists

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Saleem Malik-Wasim Akram | ‘तो’ मला नोकराप्रमाणे वागवायचा; पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रम यांचा गंभीर आरोप