पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्यांना (PMC Employee) सानुग्रह अनुदान देण्यास आज महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) मान्यता दिली आहे. येत्या १८ तारखेपर्यंत अधिकारी आणि कर्मचार्यांची पगार बिले तपासून तातडीने सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune PMC News)
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान दिले जाते. दिवाळी येत्या २१ ऑक्टोबरला सुरू होणार असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांत कार्यालयीन तांत्रिक प्रक्रिया पार पडल्यानंतर हे सानुग्रह अनुदान वितरीत होणार आहे. (Pune PMC News)
दरम्यान, अधिकारी व कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या जानेवारी २०१६ पासूनच्या फरकाची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही.
टप्प्याटप्प्याने ही रक्कम देण्यात येणार असली तरी मागील तीन ते चार महिन्यांपासून अधिकारी व कर्मचारी फरकाच्या पहिल्या टप्प्याची वाट पाहात आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम अद्याप पदरात पडत नसल्याने कर्मचार्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ही रक्कम दिवाळीमध्ये मिळाल्यास काही कौटुंबिक स्वप्न निश्चितपणे पूर्ण करता येतील, अशी उत्सुकतापूर्वक चर्चा कर्मचारी वर्गामध्ये आहे.
Web Title :- Pune PMC News | Sanugrah grants to officers and employees of
Pune Municipal Corporation approved on the occasion of Diwali
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Firing In Islampur | कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करणारा राष्ट्रवादीचा माजी नगरसवेक गजाआड
- Rain Water In Pune PMC | पुणे महापालिका भवनच्या आवारातही साचले तळे
- Vinayak Raut | विनायक राऊतांची कडवट टीका, नारायण राणे आणि पनवती हे समीकरण…