Pune PMC News | शुक्रवार पेठेतील सिटी पोस्टलगतच्या गल्लीतील 40 स्टॉल्स सील; महापालिका बेकायदा व्यावसायिकांचे ‘परवाने’ निलंबित करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth, Pune) सिटी पोस्ट (City Post Office) लगतच्या गल्लीतील तब्बल ४० स्टॉल्स आज महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण विभागाने सील केले. येथील बहुतांश स्टॉल्स भाड्याने (Illegal Stall) दिल्याने तसेच प्रमाणापेक्षा अधिक आकाराचे बांधल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे (PMC Anti Encroachment Department) प्रमुख माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी दिली. यासोबतच अतिक्रमण विभागाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील ज्या स्टॉलधारकांना दोन वेळा नोटीस बजावल्यानंतरही तिसर्‍यांदा नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबधित स्टॉलचा परवाना निलंबीत करण्याची कारवाई देखिल लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती जगताप यांनी दिली. (Pune PMC News)

 

सिटी पोस्ट लगतच्या गल्लीमध्ये मोठ्याप्रमाणावर स्टॉल्स आहेत. प्रामुख्याने येथील स्टॉल्सला हातगाडींचे परवाने आहेत. परंतू येथील बहुतांश स्टॉल्समध्ये भाडेकरू ठेवल्याचे आढळून आले आहे. तसेच महापालिकेने नेमून दिलेल्या आकारापेक्षा अधिक आकाराचे स्टॉल्स केल्याने आज ही कारवाई करण्यात आली आहे. तुळशीबाग (Tulshibaug Pune), बिबवेवाडी (Bibvewadi), हडपसर (Hadapsar) येथील स्टॉल्स थकबाकी, भाड्याने दिल्याने सील करण्याची मोठी कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सिटी पोस्ट लगतच्या गल्लीमध्ये आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Pune PMC News)

माधव जगताप यांनी सांगितले, की शहरातील अनेक ठिकाणचे स्टॉल्स हे भाड्याने अन्य व्यावसायीकांना देण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.
यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे. अतिक्रमण अथवा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या व्यावसायीकांना दोन वेळा नोटीस देण्यात आली आहे,
तिसर्‍यावेळी उल्लंघन झाल्याचे आढळल्यास स्टॉल अथवा पथारीचे परवाने निलंबीत करण्यात येणार आहेत.

 

Web Title :- Pune PMC News | Sealing of 40 stalls in the street next to the City Post in Sukar Peth; The Municipal Corporation will suspend the ‘licences’ of illegal traders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ

 

Maharashtra Monsoon Season | अजित पवारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री ‘क्लीन बोल्ड’, सरकारची नामुष्की

 

Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा