Pune PMC News | पावसाळ्यासाठी क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारा; महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | पावसाळा पुर्व आणि पावसाळ्यात करायच्या आपत्कालीन कामांसाठी व आपत्ती व्यवस्थापनकरिता क्षेत्रिय सहाय्यक आयुक्त कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन करण्यात यावे. एक जूनपासू सर्व क्षेत्रिय कार्यालय स्तरावर चोवीस तास सुरू राहील असा स्वतंत्र वॉर रुम आणि पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा असे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale IAS) यांनी दिले आहेत.(Pune PMC News)

या क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमध्ये आवश्यक तो स्टाफ, चोवीस तास संपर्क करता येईल यासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक, नोडल ऑफीसरचा मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी, वायरलेस यंत्रणा मुख्य आपत्कालीन केंद्रांशी जोडण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यापुर्वी पावसाळी लाईनची साफसफाई, ड्रेनेज लाईन तसेच नाले व कल्व्हर्ट साफसफाईची कामे मुख्य खात्यांमार्फत करण्यात आली आहेत.
त्याअनुषंगाने मुख्य खात्यामार्फत क्षेत्रिय स्तरावर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढविल्यास तात्काळ प्रतिसाद देण्याकरिता टीम तयार ठेवावी.
आपत्तीमध्ये प्रामुख्याने इमारत कोसळणे, नाले ओढ्याचे पाणी सखल भागात शिरणे, नागरिकांना स्थलांतरीत करणे
अशा घटनांमध्ये या टीमची मदत होईल. टीममधील कर्मचार्‍यांना अग्निशामक दलाकडून प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही आयुक्त भोसले यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू