Pune PMC News | प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीला गती ! पुणे महापालिकेकडून 25 दिवसांत 2256 किलो प्लास्टिक जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | केंद्र शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने 1 जुलैपासून शहरातील प्लास्टिक बंदीवरील (Plastic Ban) कारवाई अधिकच तीव्र केली आहे. मागील 25 दिवसांमध्ये तब्बल 185 केसेसमध्ये 2 हजार 256 किलो प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेले प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर या केसेसमध्ये तब्बल 9 लाख 70 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती घन कचरा विभागाच्या प्रमुख आशा राउत (Asha Raut PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

 

राउत यांनी सांगितले, की महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. राज्यात 2018 पासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईला 1 जुलैपासून अधिक गती देण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणावर दुष्परिणाम करणार्‍या प्लास्टिकचा वापर टाळावा असेही आवाहन राउत यांनी केले आहे. (Pune PMC News)

पुणे शहराला जोडणार्‍या महामार्गांच्या कडेला रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो.
याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने 12 जुलैपासून महामार्गालगत कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गस्ती पथक स्थापन केले आहे.
प्रायोगिक तत्वावर कात्रज – देहूरोड बाह्यवळण मार्गावर महापालिकेच्या हद्दीमध्ये कात्रज घाटापर्यंत हे पथक तैनात केले आहे.
मागील दोन आठवड्यांमध्ये या पथकाने कचरा टाकणार्‍या 15 जणांवर कारवाई केली आहे.
त्यांच्याकडून साडेनऊ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती आशा राउत यांनी दिली.

 

 

Web Title :- Pune PMC News | Speeding up the ban on plastic bags Pune Municipal Corporation seized 2256 kg of plastic in 25 days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा