Pune PMC News | जुन्या वस्तू कचर्‍यात टाकताय तर थांबा, गरजूंची दिवाळी गोड होईल; महापालिकेची स्वच्छ व्हि – कलेक्ट मोहिम 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News |  महापालिकेने घरातील जुन्या टाकाउ परंतू पुर्नवापरात येणार्‍या वस्तूंचे संकलन सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने गोळा होणारे जुने कपडे, पुस्तके, भांडी, इलेक्ट्रॉनीक उपकरणे, शोभेच्या वस्तुंचे वाटप गरजूंना अथवा या वस्तुंचा वापर पुर्ननिर्माणासाठी केला जाणार आहे. ‘दिवाळी आवरा आवर ’ या विशेष मोहीमेअंतर्गत 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान संपुर्ण शहरात क्षेत्रिय कार्यालयांमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असून संकलन केंद्रांची यादी ही www.pmc.gov.in/mr/v-collect-drive-2022 या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन घनकचरा विभागाच्या (Solid Waste Division) प्रमुख आशा राउत (Asha Raut) यांनी केले आहे. (Pune PMC News)

 

दिवाळी (Diwali) निमित्त होणार्‍या स्वच्छतेमध्ये घरे आणि कार्यालयातील वापराच्या अनेक जुन्या वस्तू कचर्‍यामध्ये टाकण्यात येतात. यापैकी बहुतांश वस्तुंवर प्रक्रिया होत नसल्याने पर्यावरणाची हानी होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिका मागील काही वर्षांपासून व्ही कलेक्ट मोहिमेचे आयोजन करत आहे. मागीलवर्षी दिवाळीमध्ये या मोहीमेअंतर्गत 95 टन जुन्या वस्तूंचे संकलन करण्यात आले होते. गरजूंना या मोहिमेचा चांगला लाभ झाला. यंदाही 2 ऑक्टोबरपासून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ फिरते व्ही कलेक्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. आपल्या भागातील व्हि कलेक्ट फिरत्या संकलन केंद्राची सविस्तर माहीती वरिल संकेतस्थळावर देण्यात आली आहे, असे राउत यांनी नमूद केले आहे. (Pune PMC News)

 

Web Title :- Pune PMC News | Stop throwing away old things, Diwali will be sweet for the
needy; Swachh Vi-Collect campaign of the Municipal Corporation from 12th to 16th October

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा