Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पर्यावरणाला हानी पोहोचवणार्‍या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर केंद्र शासनाने आजपासून बंदी (Single Use Plastic Ban) घातल्यानंतर विशेष मोहीम राबविणार्‍या पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) पहिल्याच दिवशी १४ व्यावसायीकांवर कारवाई करत ७० हजार रुपये दंड वसुल केला व तब्बल ३९१ किलो प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्य जप्त केले. (Pune PMC News)

 

पर्यावरणासाठी हानीकारक ठरणार्‍या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने २०१८ पासूनच बंदी घातली आहे. यानंतर राज्यात तसेच पुणे महापालिकेनेही प्लास्टिक पिशव्या व बंदी घातलेल्या यूज ऍन्ड थ्रोच्या वापरातील प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंवर कारवाई सुरू केली आहे. महापालिका व राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्यावतीने करण्यात येणार्‍या या कारवाया मध्यंतरी काहीशा थंडावल्या होत्या. परंतू केंद्र शासनाने १ जुलैपासून संपुर्ण देशभरातच या प्लास्टिकवर निबर्र्ध लादल्याने महापालिका पुन्हा ऍक्शन मोडवर आली आहे. (Pune PMC News)

 

पहिल्याच दिवशी महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या १४ व्यावसायीकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे ३९१ किलो प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य साहीत्य जप्त केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून पहिल्या कारवाईसाठीचा प्रत्येकी ५ हजार रुपये दंडही वसुल केला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राउत (Asha Raut) यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself,
PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा