Pune PMC News | पीपीपी तत्त्वावर 200 कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध; वाघोली ते लोहगाव रिंगरोड आणि महंमदवाडीतील दोन रस्त्यांचा समावेश

पुणे : Pune PMC News | पुणे महापालिकेच्या वतीने नगर रस्त्यावरून लोहगाव मार्गे पिंपरी चिंचवडकडे जाणारा रिंग रोड व महंमदवाडी येथील स. न. 24 मी.रुंदीचे दोन डी. पी. रस्ते क्रेडिट नोट च्या माध्यमातून पीपीपी तत्वावर विकसित करण्यासाठी निविदा (PMC Issue Tender Notice) काढण्यात आली आहे. या रस्त्यांसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. (Pune PMC News)

रस्ते विकसनाला मोठ्या प्रमाणावर खर्च असल्याने विकास आराखड्यातील रस्ते अनेक वर्षे रखडतात. यामध्ये भूसंपादन हे देखील विलंबासाठी कारण ठरते. दरम्यान विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीनुसार बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात रस्त्या पुरेसा रुंद नसला तरी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहून परिसर गजबजून जातो. अरुंद रस्त्यांमुळे मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होत असते. (Pune PMC News)

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून पीपीपी ( पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ) तत्वावर अर्थात खासगी तत्वावर रस्ते विकसित करण्यासाठी पावले उचलली आहेत. मागील वर्षांपासून रस्ते विकसित करणाऱ्या विकासकांना क्रेडिट नोट च्या माध्यमातून परतावा देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत बाणेर, मुंढवा, खराडी, गंगाधाम चौक येथील रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामाच्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून मुंढवा येथे प्रत्यक्षात काम ही सुरू झाले आहे.

नुकतेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी राज्य रस्ते प्राधिकरणा च्या
वतीने करण्यात येणाऱ्या रिंगरोड मधील पालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी
कमी करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या वाघोली – लोहगाव येथून पिंपरी चिंचवड पालिका हद्दीला जोडणाऱ्या 5.7 कि. मी.
65 फूट रुंदीच्या रिंगरोड चे काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्या रस्त्याच्या कामाची आज 178 कोटी रुपयांची
निविदा काढण्यात आली आहे.

यासोबतच महंमदवाडी स.न. 26,27 आणि 37 मधील 24 मी. डीपी रस्ता व कलव्हर्ट, व स.न. 38,
40,41,55,56 मधून जाणारा 30 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करण्याचे 22 कोटी रुपये खर्चाची
निविदा काढण्यात आली आहे.

Web Title :- Pune PMC News | Tender for three roads costing Rs 200 crore on PPP basis released; Including Wagholi to Lohgaon ring road and two roads from Mahamdwadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update