Pune PMC News | होर्डींग्जच्या परवाना शुल्काची थकबाकी होर्डींग्ज लावलेल्या इमारतीतील सदनिकाधारक अथवा विकसकाच्या मिळकतकरावर परवाना शुल्कथकबाकीचा बोजा चढविणार – डॉ. कुणाल खेमनार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहर विद्रुपीकरण करणारे होर्डींग्ज आणि बॅनर्स हटविण्यास टाळंटाळ करणार्‍या अधिकार्‍यांना नोटीसेस द्यायला सुरूवात केल्यानंतर शहरातील बेकायदा होर्डींग्ज आणि बॅनर्स हटविण्याच्या कारवाईला वेग आला आहे. एवढेच नव्हे तर ज्या होर्डींग्ज मालकांनी थकबाकी भरण्याकडे पाठ फिरविली आहे, त्यांच्या ऐवजी ज्या इमारतींवर असे होर्डीग्ज लावण्यात आले आहेत त्या इमारतींतील सदनिकांधारकांच्या मिळकत करामध्ये बोजा चढविण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

 

पुणे शहरामध्ये जवळपास १ हजार ९७४ बेकायदा होर्डींग्ज आहेत. ही होर्डींग्ज काढण्यासाठी महापालिकेेने मोहीम हाती घेतली आहे.
यापैकी ज्यांचे नियमीतीकरण शक्य आहे, त्यांच्याकडून अर्जही मागविण्यात येत आहे.
तर उर्वरीत होर्डींग्जवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये दररोज ५ अनधिकृत होर्डींग्ज काढण्यात येत आहेत.
यासोबतच परवानगी घेतलेली परंतू महापालिकेकडील परवाना शुल्काच्या थकबाकीदार होर्डींग्जवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्या होर्डींग्ज धारकांकडे थकबाकी आहे, त्यांच्याकडून वसुलीसाठी नोटीसेस पाठविण्यात येत आहेत. परंतू यानंतरही थकबाकी न भरणार्‍यांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ज्या होर्डींग्ज धारकांची मिळकत कर आकारणी झालेली मिळकत नाही अशा ठिकाणी ज्या मिळकतीवर हे होर्डींग लावण्यात आले आहे त्या इमारतीतील सदनिका धारक अथवा विकसकाच्या मिळकतींवर बोजा चढविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकारे ४४ होर्डींग्जबाबत कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. खेमनार यांनी दिली. (Pune PMC News)

 

Web Title :- Pune PMC News | The arrears of license fee of hoardings will be borne by the owner or developer of the building where the hoardings are installed. Kunal Khemnar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर