Pune PMC News | पुणे महापालिकेचा अंदाजपत्रकाचा मुहूर्त टळणार ! मुदतवाढीसंदर्भात स्थायी समितीसमोर प्रस्ताव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेचा आगामी २०२३ -२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचा मुहूर्त टळणार आहे. प्रशासनाकडून १५ जानेवारीपर्यंत अंदाजपत्रकाचा आराखडा हे स्थायी समितीसमोर ठेवणे आवश्यक असते, यंदा मात्र प्रशासनाकडून सदर अंदाजपत्रक उशिरा सादर केले जाणार आहे.

 

महापालिका प्रशासनाने यासंदर्भात स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार महापालिकेचे महसुली, भांडवली उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक (आराखडा ) १५ जानेवारीपर्यंत किंवा त्यापुर्वी स्थायी समितीसमोर ठेवणे आवश्यक आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सदरचे अंदाजपत्रक हे अलाहीदा सादर करण्यात येत आहे, त्यास मान्यता मिळावी असे या प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे प्रत्यक्षात प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक केव्हा मिळेल याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. (Pune PMC News)

साधारणपणे नोव्हेंबर महीन्यापासून प्रशासनाकडून अंदाजपत्रकाचा आराखडा तयार करण्याची तयारी केली जाते. यंदाही प्रशासनाकडून विभागवार बैठका घेण्यात आल्या होत्या. परंतु, या महीन्यात जी २० ही परीषद पुण्यात पार पडत आहे. यापार्श्वभुमीवर तयारी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाला कामात गुंतली आहे. सातत्याने होणार्‍या बैठका, केंद्रीय अधिकार्‍यांकडून घेतला जाणारा आढावा यामुळे अधिकारी कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी व्यस्त झाले आहे. यामुळेच अंदाजपत्रकाचा आराखडा वेळेत तयार होण्यास विलंब लागू शकत असल्यानेच प्रशासनाकडून अंदाजपत्रकाचा आराखडला अलाहीदा सादर करण्यास मान्यता मागितली आहे. नियमित पद्धतीत प्रशासनाकडून स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले जाते. यानंतर स्थायी समिती या अंदाजपत्रकाच्या आराखड्यात बदल करते, तसेच नगरसेवकांच्या निधीतील कामाची तरतुद यात केली जाते. स्थायी समिती यानंतर हे अंदाजपत्रक मुख्यसभेला सादर करीत असते. मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाते. परंतु, यंदा प्रशासकीय राज असल्याचा परीणाम अंदाजपत्रकावर पडणार आहे. (Pune PMC News)

 

Web Title :- Pune PMC News | The Budget of Pune Municipal Corporation will be postponed! Proposal before the Standing Committee regarding extension of time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा