Pune PMC News | सत्ताधारी आमदाराशी संबधित ‘क्रिस्टल’ कंपनीने अद्यापही महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे वेतन दिलेच नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेतील ‘क्रिस्टल’ कंपनीकडील सुरक्षा रक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे सर्वसामान्य सुरक्षा रक्षक मेटाकुटीला आले आहेत. विशेष असे की सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्याची ही कंपनी असून दोन वर्षांपुर्वी अनेक नियमांत बदल करून या कंपनीलाच सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट मिळावे यासाठी महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी प्रयत्न केले होते. (Pune PMC News)

 

महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने १ हजार ६६० सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. महापालिकेची कार्यालये, उद्याने, मैदाने, जल पुरवठा केंद्र, रुग्णालये तसेच महापालिकेच्या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी ही नेमणूक करण्यात आली आहे. हे काम क्रिस्टल या कंपनीला देण्यात आले होते. ही कंपनी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका विधान परिषद आमदाराशी संबधित आहे. तत्पुर्वी महापालिका तीन ते चार ठेकेदार कंपन्यांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम देत असे. साधारण प्रत्येक कंपनीकडून ३०० ते ४०० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जायची. परंतु दोन वर्षांपुर्वी महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी सुरक्षा रक्षक पुरवणार्‍या छोट्या कंपन्या सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक करतात, त्यामुळे एकाच कंपनीकडून सर्व सुरक्षा रक्षक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तो केवळ एवढ्या मोठ्याप्रमाणावर सुरक्षा रक्षक पुरविण्याचा अनुभव नसलेल्या छोटया ठेकेदार कंपन्या स्पर्धेतून बाहेर पडतील आणि आपल्या आमदाराच्या कंपनीचे ‘लाड’ पुरवणे शक्य होईल, यासाठीच ही नियमावली बनविण्यात आली. झाले देखिल तसेच पुर्वी काम करणार्‍या ठेकेदार कंपन्या बाजूला पडल्या आणि ‘क्रिस्टल’ कंपनीला काम मिळाले. (Pune PMC News)

परंतू या कंपनीने देखिल कर्मचार्‍यांची आर्थिक पिळवणूकच केल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे वेतन थकवले आहे. कर्मचार्‍यांचे वेतन मिळावे यासाठी कामगार संघटनांनी थंडी पावसात वेळोेवेळी आंदोलन केले. त्यावेळी एक महिन्याभराचे वेतन देउन आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. परंतू अद्यापही अनेक कर्मचार्‍यांचे एक ते दीड महिन्याचे वेतन मिळालेले नाही. अवघ्या १२ ते १३ हजार रुपयांमध्ये काम करणार्‍यां कर्मचार्‍यांसाठी ही रक्कम फार मोठी असून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह यावरच आहे.

 

महापालिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कंत्राटी सुरक्षा रक्षकांची खोगीर भरती आणि उधळपट्टी होत
असल्याचे नमूद करत २०१७ मध्ये स्थायी समितीने कंत्राटी सुरक्षा रक्षकांची संख्या १३०० वरुन ९५० पर्यंत कमी केली.
परंतू दुसर्‍या, तिसर्‍या वर्षानंतर ही संख्या पुन्हा हळूहळू वाढत गेली. चवथ्या वर्षी तर या संख्येने १६६० चा पल्ला गाठला.
एकाच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या परस्पर विरोधी भुमिकेमुळे महापालिकेच्या कारभाराचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | The ‘Crystal’ company associated with the ruling MLA has still not paid the salary of the municipal security guards

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना