Pune PMC News | महापालिकेचा विद्युत विभाग सी.एस.आर.च्या नावाखाली ठेकेदारांच्या मानगुटीवर खर्च लादतो

जी २० साठी उभारलेली विद्युत रोषणाईची कृत्रिम झाडे सी.एस.आर. नव्हे ठेकेदारांनीच उभारल्याचे उघड

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | जी २० परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील पुणे शहरातील कार्यक्रम नुकतेच पार पडले. यानिमित्ताने शहराच्या काही भागात रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने रस्ते उजळवून परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. परंतू यातील विद्युत रोषणाई ही सीएसआर नव्हे तर महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील ठेकेदारांच्या मानगुटीवर बसून करून घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. (Pune PMC News)

 

पुणे शहरात १६ आणि १७ जानेवारी रोजी जी २० अंतर्गत विविध देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरातील रस्ते, पदपथ चकाचक करण्यात आले होते. रस्त्याकडेच्या भिंती, दुभाजक, पदपथ, उड्डाणपुलांच्या भिंतीही रंगवून चकाचक करण्यात आल्या होत्या. प्रशासनाने बीओटी तत्वावर शहरातील प्रमुख ५४ हून अधिक चौकांमध्ये आणि आयलँडचे सुशोभीकरण केले आहे. तर महापालिकेच्या विद्युत विभागाच्यावतीने शहरातील पथदिव्यांवर तिरंग्यातील तीन रंगाच्या वीजेच्या माळा सजविल्या. यापुढे जाउन विद्युत विभागाने परदेशी पाहुण्यांच्या मार्गावर ११ ठिकाणी रंगबेरंगी विज दिव्यांची रोषणाई असलेली कृत्रिम झाडे (ल्युमिनो ट्री) देखिल ठेवली होती. (Pune PMC News)

 

दरम्यान, आज संध्याकाळपासून ही झाडे उचलण्यास संबधित ठेकेदाराने सुरूवात केली आहे.
महापालिकेने कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या या कृत्रिम झाडांसाठी खर्च कोणी केला? याबाबत विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेतल्यानंतर परस्पर विरोधी उत्तरे मिळत आहेत. यासंदर्भात विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले सी.एस.आर.च्या माध्यमातून चार दिवसांसाठी ही कृत्रिम झाडे घेण्यात आली होती. एका झाडासाठी प्रत्येक दिवसासाठी ५ हजार रुपये खर्च झाला आहे. सी.एस.आर.साठी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराबाबत विचारले असता कंदुल यांनी माहिती घेउन सांगतो असे स्पष्टीकरण दिले.

यासंदर्भात विद्युत विभागाचेच कार्यकारी अभियंता अभिजीत साठे यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील (एस.टी.पी.प्लांट) ठेकेदारांनी या झाडांसाठीचा खर्च उचलल्याची माहिती दिली.
एकाच विभागातील दोन अधिकार्‍यांच्या परस्पर विरोधी माहितीमुळे विद्युत विभाग सी.एस.आर.च्या नावाखाली ठेकेदारांच्या मानगुटीवर बसत असल्याचे समोर आले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | The electricity department of the municipal corporation imposes costs on the shoulders of contractors in the name of CSR

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना