Pune PMC News | कात्रज ते खडीमशीन चौकातील नियोजीत रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेने हटविली परंतू भूसंपादन आणि पुर्नवसनाशिवाय रस्त्याचे काम होण्याची शक्यता कमीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | कात्रज -कोंढवा रस्त्याच्या (Katraj Kondhwa Road) विकासामध्ये येणारी अतिक्रमणे (Encroachment On Katraj Kondhwa Raod) आज महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) पाडून टाकून आज आक्रमक पाउल उचलले. परंतू ही अतिक्रमणे काढून टाकल्यानंतरही येथील जागेवर आणखी काही घरे असून भूसंपादन (Land Acquisition) केल्याशिवाय रस्त्याचा मार्ग मोकळा होणार नसल्याने या रस्त्याच्या विकासासाठी आणखी किती काळ प्रतिक्षा करावी लागणार हे अनिश्‍चित आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेच्यावतीने आज शत्रूजंय मंदिराकडून सुरू होणार्‍या ग्रेड सेपरेटरमधून स्मशानभूमीच्या मागील बाजूने स.नं. ५४ येथून खडी मशीन चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. प्रत्यक्षात विकास आराखड्यामध्ये हा रस्ता ८४ फूट रुंदीचा असला तरी भूसंपादनाअभावी तूर्तास ५४ मी. रुंदीचाच करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू देखिल झाले असून भूसंपादना अभावी अर्धवट राहीले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने आज येथील दोन जागा मालकांनी व्यवसायासाठी बेकायदेशीररित्या उभारलेले सुमारे ४० हजार चौ.फूटांचे पत्र्याचे शेडस् तसेच काही पक्के बांधकाम आज पाडून टाकले. तर काही अतिक्रमण जागा मालकांनीच उतरवून घेतली आहेत. (Pune PMC News)

 

दरम्यान, महापालिकेने आज ही कारवाई केली असली तरी रस्त्याचे काम सुरू होण्यात अनेक अडचणी आहेत. ज्या जागांवरील अतिक्रमण काढण्यात आली आहेत, त्यांनी महापालिकेकडे भूसंपादनाचा रोख मोबदला मागितला आहे. महापालिकेने रोख मोबदला दिल्याशिवाय भूसंपादन होणे व या रस्त्याचे काम सुरू होणे जवळपास अशक्य आहे. तसेच आज येथील अतिक्रमणे काढली तेथे अद्यापही काही घरे आहेत. या नागरिकांचे पुनर्वसन केल्याशिवाय ती घरेही हटविताना येणार नाहीत. त्यामुळे पुनर्वसनाचे कामही महापालिकेला हाती घ्यावे लागणार आहे.

 

सत्ताधार्‍यांच्या विकास आराखड्याच्या राजकारणाने येवलेवाडीतील सेवा सुविधा रखडल्या!

पुणे महापालिकेने येवलेवाडी परिसराचा विकास आराखडा मंजूर करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
हा विकास आराखडा तयार करताना रस्ते, कचरा प्रकल्प, मैदाने व अन्य सार्वजनिक वापरासाठीची आरक्षणे येथील जमिनीवर टाकण्यात आली आहेत.
महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी ही आरक्षणे टाकताना विरोधी पक्षांच्या भूमीपुत्रांच्या जागांवरच ही आरक्षणे टाकून
त्यांना आर्थिकदृष्टया ‘कफल्लक’ करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आराखड्याला मंजुरी देताना महापालिकेच्या सभागृहामध्ये देखिल करण्यात आला आहे.
केवळ राजकिय हेतू साध्य करण्यासाठी आराखड्याचे राजकारण केल्याने येवलेवाडी,
कोंढवा परिसर वाहतूक कोंडी व अन्य सुविधांपासून वंचित राहात असून सत्ताधारीच याला कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा कोंढवा, येवलेवाडी (Yewalewadi) परिसरात सुरू आहे.

 

Web Title :- Pune PMC News | The encroachments on the planned road from Katraj to
khadi machine chowk have been removed by the Pune Municipal Corporation pmc,
but without land acquisition and rehabilitation, there is little chance of road work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा