Pune PMC News | काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या रस्ते ठेकेदारांचा अंतिम अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठविणार – अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | डीएलएफमधील (Defects Liability Periods) रस्त्यांवरील खड्डयांना दोषी ठरविलेल्या १० ठेकेदारांची (Contractor) आज सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये ठेकेदारांनी दिलेली कारणीमिमांसा तसेच पथ विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लवकरच अहवाल तयार करून महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr. Kunal Khemnar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

निकृष्ट कामामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिकेने एक महिन्यांपुर्वी १३ ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकले आहे. तसेच महापालिकेच्या संबधित अधिकार्‍यांवरही कारवाई केली आहे. प्रशासनाने याबाबत ठेकेदारांकडून कुठलाही खुलासा न मागविता कारवाई केल्याने यापैकी १० ठेकेदारांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये आम्ही केलेल्या रस्त्यांवर अन्य विभागाने कामासाठी केलेल्या खोदाईमुळे खड्डे पडल्याचे, DLF उलटून गेल्यानंतरही काळ्या यादीत टाकल्याची कारवाई झाल्याचे मुद्दे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडले आहेत. दोन आठवड्यांपुर्वी या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने ठेकेदारांना खुलासा करण्याची संधी देण्यात आली नसल्याने ठेकेदारांवरील कारवाईला स्थगिती दिली. तसेच ठेकेदारांची बाजू ऐकून घेउन पुढील कार्यवाही करावी, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. खेमनार यांनी याचिकाकर्त्याची बाजू आज ऐकून घेतली. (Pune PMC News)

 

यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी सांगितले, की न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्त्या ठेकेदारांची आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी काहींनी ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारे, पाईपलाईन व अन्य कामांमुळे डीएलएफमधील रस्ते खोदण्यात आले व त्याचठिकाणी खड्डे पडल्याचे पुराव्यांसह निदर्शनास आणून दिले. तसेच काहींनी त्यांच्यावर चुकीची कारवाई झाल्याचे यावेळी सांगितले. सर्वांची भूमिका आणि पथ विभागाकडून खातरजमा करून लवकरच अंतिम अहवाल तयार करून आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. तसेच काळया यादीत (PMC Blacklisted Contractors) टाकण्यात आलेल्या ठेकेदारांनी अन्य कामाच्या निविदा भरल्या असतील तर अंतिम अहवाल येईपर्यंत त्या होल्डवर ठेवण्यात येतील.

परस्पर जागा बदल करून खाजगी जागेवर रस्ते केल्याचीही प्रकरणे समोर; क्षेत्रिय कार्यालयांकडील या उद्योगांना जबाबदार असणार्‍यांवर कारवाई होणार

 

प्रशासनाच्यावतीने क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या अंतर्गत छोट्या रस्त्यांच्या कामांची देखिल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
डीएलएफमध्ये असलेल्या अनेक छोट्या रस्त्यांवरही अनेकठिकाणी खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे.
विविध क्षेत्रिय कार्यालयांकडून तसे अहवाल देखिल आले आहेत.
यापुर्वीच्या कारवाईचा अनुभव लक्षात घेउन संबधित अभियंते आणि ठेकेदारांकडून खुलासे मागविण्यात येणार आहेत.
त्यानंतर दोषी आढळणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येणार आहे.
छोट्या कामांमध्ये अनेक ठिकाणी जागा बदल करण्यात आल्याची प्रकरणेही निदर्शनास आली आहेत.
परस्पर जागा बदल करून खाजगी जागेत रस्ते केल्याचे निदर्शनास आलेल्यांवरही कारवाई करण्यात येणार
असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | The final report of the blacklisted road contractors will be sent to the Municipal Commissioner – Additional Commissioner Dr. Kunal Khemnar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

Dil To Pagal Hai | ‘दिल तो पागल है’ सिनेमाला 25 वर्ष पूर्ण; तर माधुरी आणि करिश्माने शेअर केली ‘हि’ स्पेशल पोस्ट

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’