पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | दौंड तालुक्यातील देउळगाव गाडा या गावातील कंपनीला महापालिकेच्या रामटेकडी येथील कोणत्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून प्लास्टिकचा पुरवठा करण्यात आला त्या प्रकल्पाचा शोध घन कचरा विभागाने सुरू केला आहे. अतिरिक्त आयुक्तांनी थेट कचरा घेउन गेलेला ट्रक कोणत्या प्रकल्पातून गेला हे शोधण्याचे आदेश दिले आहेत.(Pune PMC News)
यवत जवळील देउळगाव गाडा येथील कंपनीतील बॉयलर पेटविण्यासाठी कचर्यातून वेगळे केलेले प्लास्टिक, चिंध्या घेउन जाणारा ललवाणी ट्रान्सपोर्ट कंपनीला ट्रक (ट्रक क्रमांक एम एच १२ एम.व्ही. ९२९९)नुकतेच ग्रामस्थांनी पकडून यवत पोलिसांच्या स्वाधीन केला.
यवत पोलिसांनी पर्यावरण कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाने हा प्लास्टिकचा कचरा रामटेकडी परिसरातील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून आणल्याचे जबाबात नमूद केले आहे.
२८ ऑगस्टला दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत माध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे.
तर यवत पोलिसांकडूनही याप्रकरणी पुढे फारसा तपास केलेला नाही.
यासंदर्भात घन कचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून संबधित ट्रक बाबत माहिती मागविण्यात आली आहे.
ज्या प्रकल्पातून हा प्लास्टिक कचरा गेला असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले, की ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकचा क्रमांक मिळालेला असून
तो कोणत्या प्रकल्पातून गेला आहे, हे लक्षात येईल. सर्व प्रकल्पांवर सीसीटीव्ही आहेत.
त्यामुळे फारशा अडचणी येणार नाहीत. यानिमित्ताने सर्वच प्रकल्पांतील कचरा वाहतुकीची रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा