Pune PMC News | राज्य शासनाचा महापालिकेला दणका ! आगामी वर्षासाठी होंर्डिंग परवाना शुल्क जुन्याच अर्थात 111 रुपये दारानेच आकारण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील जाहिरात फलकांसाठी ( होर्डिंग – Hoarding) 560 रुपये / चौ. फूट दर आकारणाऱ्या पुणे महापालिकेला राज्य शासनाने (State Govt) दणका दिला आहे. होंर्डिंगच्या दरावरून पुणे आऊटडोअर ऍडव्हरटायजिंग असोसिएशनने (Pune Outdoor Advertising Association) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने याचिका निकाली निघेपर्यंत 111 रुपये / चौ. फूट दरानुसारच 2023 – 24 या वर्षी आकारणी करून होंर्डिंग परवाने नूतनीकरण करावेत, असे आदेश आज राज्य शासनाने पालिकेला दिले आहेत. (Pune PMC News)

 

महापालिकेने शहरातील होंर्डिंगसाठी 560 रुपये चौ. फूट तर उपनगर व समाविष्ट गावांमध्ये वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. यामुळे होंर्डिंग व्यावसायिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. विशेष असे की, पालिकेने काही वर्षांपूर्वी हा दर 222 रुपये केल्याने असोसिएशन न्यायालयात गेली आहे. यावर न्यायालयाने अंतरिम आदेश देताना याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत पालिकेने जुन्या अर्थात 111 रुपये दरानेच परवाना नूतनीकरण शुल्क आकारावे असे निर्देश दिले आहेत. ही परिस्थिती असताना पालिकेने चालू वर्षी 111 रुपये आकारून होंर्डिंग परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. मात्र येत्या आर्थिक वर्षासाठी 560 दर निश्चित केला आहे. या विरोधात असोसिएशन ने राज्य शासनाकडे दाद मागितली होती, त्यावर शासनाने आज पालिकेला आज वरील आदेश दिले आहेत. (Pune PMC News)

 

Web Title :- Pune PMC News | The state government’s blow to the municipal corporation! Order to levy honarding license fee for next year as old i.e. 111 rupees at door only

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ashish Chandarana | म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार