Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त

महापालिका प्रशासक आणि आयुक्त विक्रम कुमार

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरात निर्माण होणार्‍या मैला पाण्यावर पूर्णत: प्रक्रिया होत नाही तोपर्यंत स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये पुणे महापालिकेला स्वच्छ भारत अभियान स्पर्धेमध्ये चांगले रँकींग मिळणार नाही. जायका नदी सुधार योजनेअंतर्गत ११ एसटीपींचे काम तसेच समाविष्ट गावांतही एसटीपी प्लांट उभारले जात नाहीत, तोपर्यंत स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये पुणे महापालिका पहिल्या आठ शहरांमध्ये येउ शकणार नाही, असे महापालिका प्रशासक आणि आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे एसटीपी प्लांट गतीने उभारण्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करणे तसेच कचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा अधिकाअधिक सहभाग वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील, असा विश्‍वासही विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. (Pune PMC News)

 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेमध्ये पुणे महापालिकेला यंदा ९ वे स्थान मिळाले आहे. मागीलवर्षी असलेल्या पाचव्या स्थानावरून महापालिकेेची घसरण झाली आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विचारणा केली असता त्यांनी वरिल माहिती दिली. कुमार यांनी सांगितले,की स्पर्धेच्या मार्कींग सिस्टिममध्ये मैलापाण्यावर प्रक्रिया व त्याचा पुर्नवापर करण्यासही मानांकन होते. पुणे महापालिकेचे सध्या ११ एसटीपी प्लांटस आहेत. परंतू शहरात निर्माण होणार्‍या मैलापाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया होत नसल्याने जायका नदी सुधार योजनेअंतर्गत ११ तसेच समाविष्ट अकरा गावांमध्ये २ एसटीपी प्लांटस् उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Pune PMC News)

एनजीटीच्या निर्देशानुसार जुन्या प्लांटस्मध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून ते वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्लांटस् जोपर्यंत कार्यरत होणार नाहीत, तोपर्यंत महापालिकेला चांगले मानांकन मिळणार नाही. यंदाच्यावर्षी ७ महापालिकांना फाईव्ह स्टार मानांकन मिळाले आहे. त्या महापालिकांमध्ये मैलापाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया होते. तसेच प्रथम आलेली इंदूर आणि विशाखापट्टणम महापालिकेतही मैलापाणी प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर होत असल्याने त्यांना सेव्हन स्टार मानांकन मिळाले आहे. तर आठव्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबाद महापालिकेला आपल्यापेक्षा केवळ १३ मार्कस अधिक आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या स्पर्धेतही आपण फारतर आठव्या क्रमांकावर येउ शकतो किंवा अन्य महापालिकांनी मैलापाणी प्रक्रिया व पुर्नवापरातील रेटींग सुधारल्यास आपण ९ व्या क्रमांकावरून आणखी खाली येउ शकतो, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.

या स्पर्धेमध्ये सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी टाकला जाणारा कचरा याचाही विचार केला जातो.
सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ राहावीत यासाठी महापालिकेने वेळोवेळी उपाययोजना केल्या असून यंदाही निविदा प्रक्रिया राबविली आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ राहावीत तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी यापुढील काळातही अधिकचे प्रयत्न करण्यात येतील.
शहरात सुमारे ६०० ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

 

Web Title :- Pune PMC News | ‘…Until then, Pune Municipal Corporation’s position in the Swachh Bharat competition will remain below Vikram Kumar, Administrator and Municipal Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | 6 ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार