Pune PMC News | …तोपर्यंत देवाची उरूळी येथील बायोमायनिंगचे काम सुरू करा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

‘सायंटीफिक लँडफिलिंग’ च्या कामाबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | देवाची उरूळी येथील कचरा डेपोतील (Devachi Uruli Waste Depo) जुन्या कचर्‍यावर प्रक्रिया अर्थात बायोमायनिंगचे काम पुढील निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुरू ठेवा. येथील कचरा डेपोमध्ये कचर्‍याचे ‘सायंटीफिक लँडफिलिंग’ व्यवस्थीत झालेले नसल्याबाबत नाराजी व्यक्त करतानाच प्रक्रिया न होणार्‍या रिजेक्टचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात पावले उचला, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar) यांनी सांगितले. (Pune PMC News)

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांच्या पथकाने आज देवाची उरूळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोला भेट देउन आढावा घेतला. आयुक्त विक्रम कुमार यांनी तब्बल तीन तास कचरा डेपो, लँडफिलिंग, बायोमायनिंग तसेच येथील प्रक्रिया प्रकल्पांची पाहाणी करतान संपुर्ण आढावा घेतला. यावेळी अभियंते देखिल उपस्थित होते. एनजीटीच्या आदेशानुसार येथे अनेक वर्षांपासून डंपींग केलेल्या कचर्‍याची बायोमायनिंगद्वारे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याठिकाणी साधारण ३५ लाख टनांहून अधिक कचरा असून आतापर्यंत सुमारे २० लाख टन कचर्‍यावर प्रक्रिया झाली आहे.
कॅपींग केलेल्या कचर्‍या व्यतिरिक्त अद्यापही याठिकाणी ९ ते १० लाख टन कचर्‍यावर बायोमायनिंग प्रक्रिया होणे
अद्याप बाकी आहे. परंतू पुर्वीची निविदा संपल्याने महीन्याभरापुर्वी हे काम बंद ठेवले आहे. घनकचरा विभागाने अडीच लाख टन कचर्‍यासाठीच निविदा काढण्याची तयारी केली होती. परंतू आज आयुक्तांनी स्वत: वस्तुस्थिती पाहील्यानंतर ९ ते १० लाख टन कचर्‍यासाठी निविदा काढण्याचे आदेश दिले असून यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुर्वीच्याच ठेकेदाराकडून काम सुरू ठेवा, असे आदेश दिल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

यासोबतच डेपोवरील कचर्‍याचे सायटिंफिक लँडफिलिंगची कॅपेसिटी संपली आहे.
परंतू या लँडफिलिंगमध्ये रिजेक्ट (प्रक्रिया न होउ शकणारा कचरा) सोबत प्रक्रिया होणार्‍या वस्तूही मोठ्याप्रमाणावर
आढळत असल्याबाबत विक्रम कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. प्रामुख्याने बांधकामाचा राडारोडा, गाद्या, फर्निचर, कपडे,
प्लास्टिक, काचेच्या वस्तूही आढळून येत आहेत. याप्रकरणी संबधित अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश
आयुक्तांनी यावेळी दिली. रिजेक्ट वस्तूंवरही प्रक्रिया करता येणे शक्य असेल तर तसा प्रस्ताव पाठवावा.
यामुळे लँडफिलिंग करण्याची गरज भासणार नाही, अशी सूचनाही आयुक्तांनी केल्याचे डॉ. खेमनार यांनी नमूद केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बँकेतून पसरस्पर पैसे काढून ज्येष्ठ दाम्पत्याची सव्वा कोटीची फसवणूक

होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

पुणे : घराच्या खिडकीत घुसल्या गोळ्या, ‘डीआरडीओ’च्या फायरिंग रेंजमधून गोळ्या आल्याचा अंदाज

Pune Bharti Vidyapeeth Police | भारती विद्यापीठ पोलिसांकडून रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

Wake Up Punekar Campaign | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश – माजी आमदार मोहन जोशी

Pune Wagholi Crime | होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

Ritaa India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या वतीने “वित्तीय गुंतवणूक आणि संधी” कार्यशाळा संपन्न

Pune Kondhwa Crime | विभक्त राहणाऱ्या पत्नीवर ब्लेडने सपासप वार, कोंढवा येथील प्रकार