Pune PMC News | महापालिकेची शहरी गरिब वैद्यकीय योजनेची कार्ड मिळणार ‘ऑनलाईन’ !

संगणकीकरणामुळे योजनेतील अनेक त्रुटी दूर होउन गरिबांना मिळणार तातडीने दिलासा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा दावा

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुण्यातील झोपडपट्टीवासिय आणि गरिब कुटुंबातील नागरिकांसाठी वरदायीनी ठरलेल्या शहरी गरीब योजनेचे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) ‘डिजिटायजेशन’ (संगणकीकरण) केले आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाही. तसेच उत्पन्नाचे बनावट दाखले व कमी उत्पन्नाचे दाखल्यांचा वापर करून या योजनेमध्ये घुसखोरी करून गरिबांच्या योजनेवर डल्ला मारणार्‍यांना देखिल चाप बसणार आहे, असा दावा महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. (Pune PMC News)

 

महापालिका हद्दीतील दारिद्रय रेषेखालील नागरीक आणि एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या पुणेकर नागरिकांसाठी मागील १२ वर्षांपासून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवत आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांना सुमारे ४०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत झाली आहे. या योजनेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेने या योजनेचे संगणकीकरण केले आहे. यावर्षी आतापर्यंत १४ हजार नागरिकांनी या योजनेअंतर्गत कार्ड काढले असून त्यापैकी ८ हजार नागरिकांची माहिती संगणकावर घेण्यात आली आहे. उर्वरीत काम पुढील आठवड्याभरात पूर्ण होणार आहे. (Pune PMC News)

 

या योजनेचे कार्ड काढण्यासाठी रहिवासाचा पुरावा, आधारकार्ड, छायाचित्र आणि तहसील कार्यालयामार्फत दिला जाणारा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो. मागील काही वर्षामध्ये पिवळे रेशनकार्ड नसलेले तसेच मोठया प्रमाणात मिळकतकर भरणारे नागरिकही या योजनेचा एक लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला मिळवून लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच उत्पन्नाच्या दाखल्यांमध्ये फोटोशॉपच्या माध्यमातून फेरफार करून शासनाची तसेच महापालिकेची फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे. गरिब नागरिकांसाठीच्या या योजनेमध्ये घुसखोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने या योजनेत अधिक अचूकता व सुसूत्रता आणण्यासाठी या योजनेचे संगणकीकरण केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade), आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Dr Ashish Bharati PMC), डॉ. मनिषा नाईक (Dr. Manisha Naik PMC) उपस्थित होत्या. (Pune PMC News)

अशी करावी लागेल नोंदणी

https://sgy.punecorporation.org/ या वेबसाईटवर भेट देउन शहरी गरीब योजनेसाठी अर्ज करण्याकरिता मी शर्ती वाचल्या आहेत आणि स्वीकारल्या आहेत, असे क्लिक करावे लागेल.

अर्जामध्ये म.न.पा.झोपडपट्टीत राहत असल्याचे ओळखपत्र, २०१० नंतर सेवा शुल्क भरलेली पावती, रेशनकार्ड, कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असलेला तहसीलदारांचा दाखला.

जन्म दाखले. * कुटूंबातील पात्र सभासदांचे एकत्रित व्हिजिटींग कार्ड साईजचे दोन फोटो. * सर्व कुटूंबातील पात्र सभासदांचे आधारकार्ड. * ही सर्व कागदपत्र व फोटो स्कॅन केल्यानंतर पीडीएफ अपलोड करून अर्ज सादर करावा लागेल. * कार्ड काढण्यासाठीचे शुल्क क्रेडीट, डेबिट कार्ड किंवा युपीआयद्वारे ऑनलाईन भरावे लागेल.* शुल्क भरल्यानंतर पावती मिळेल.* ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर वरिल कागदपत्र ऑनलाईन अर्जाच्या प्रतिसोबत महापालिका भवन येथील शहरी गरीब योजना कार्यालयात पडताळणीसाठी जमा करावी. * कागदपत्र पडताळणी व अर्ज मंजुरीनंतर अर्जदाराला ऑनलाईन शहरी गरीब कार्ड ऑनलाईन प्राप्त होईल.

 

उत्पन्नाचा बनावट दाखला देताय सावधान!
शहरी गरीब योजनेच्या अर्जासोबत जोडण्यात येणार्‍या उत्पन्नाच्या दाखल्याची शासनाच्या पोर्टलवरून वितरीत करण्यात आलेल्या दाखल्यासोबत पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीमध्ये बोगस दाखला दिल्याचे आढळल्यास संबधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल.

– रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त.
शहरी गरीब योजनेसाठी १ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाची अट काढून उत्पन्न मर्यादा वाढविण्याचे आमचा प्रयत्न आहे.
अधिकाअधिक गरजू नागरिकांचा यामध्ये समावेश व्हावा, यादृष्टीने प्रशासनाचा विचार सुरू आहे.
डिजिटल कार्डमुळे रुग्णालये देखिल महापालिकेला ऑनलाईन बील पाठवू शकणार आहेत,
त्यांचे पेमेंटही तातडीने करणे शक्य होणार आहे.
विविध आरोग्य योजनांचा एकाच वेळी लाभ घेणार्‍यांना देखिल प्रतिबंध करणे शक्य होणार आहे.
डिजिटल कार्डमुळे नागरिकांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

 

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.
(IAS Vikram Kumar)

 

Web Title :- Pune PMC News | Urban poor medical scheme card of Pune Municipal Corporation will be available ‘online’!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना