Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजना बंद झाल्याने यापुढील काळात या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प नाही

यापुर्वी मान्य झालेल्या प्रकल्पांतील लाभार्थ्यांना अनुदानाची कुठलिही अडचण नाही; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्टीकरण

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान केंद्र शासनाने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढील काळात महापालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प योजना राबविणार नाही. यापुर्वी मंजुर झालेल्या योजनांमधील लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळण्यात कुठलिही अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिले आहे. (Pune PMC – PM Awas Yojana)

 

केंद्र शासनाच्यावतीने संपुर्ण देशभरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बेघरांना स्वस्तात घर देण्याची योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागामध्ये स्वत:च्या जागेवर घर बांधण्यासाठी नागरिकांना २ लाख ६७ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. तसेच शहरी भागामध्ये स्थानीक स्वराज्य संस्थांच्यावतीनेही इमारती उभारून पंतप्रधान योजनेअंतर्गत परवडणार्‍या किंमतीत सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी अनुदान देण्यात येत होते. यासोबतच देशभरात इतरत्र कुठेही घर नसलेल्यांना घर खरेदीसाठी अनुदान देण्याची ही योजना होती. (Pune PMC – PM Awas Yojana)

दरम्यान, केंद्र शासनाने नुकतेच ही योजना बंद केली आहे.
पुणे महापालिकेने वडगाव, हडपसर, खराडी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २९०० सदनिका बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
महापालिकेने यासाठी स्वत:ची जागा उपलब्ध करून दिली असून शासकिय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरीत रक्कम संबधित लाभार्थ्यांनी भरायची असे योजनेचे स्वरूप आहे.
महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या यासाठी गृहप्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
येत्या मार्चमध्ये हे काम पूर्ण होउन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल.
शासनाने पंतप्रधान आवास योजना बंद केली असली तरी या योजनेअंतर्गत मान्यता मिळालेल्या प्रकल्पांना यामुळे कुठलिही अडचण येणार नाही.
मात्र, यापुढील काळात या योजनेअंतर्गत कुठलिही योजना राबविण्यात येणार नाही.
नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी योजना येतात.
त्यामुळे पुढील काळातही शासन स्तरावरून काही योजना येतील, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Pune PMC – PM Awas Yojana | As Pradhan Mantri Awas Yojana has been discontinued, there is no new project under this scheme in the future – IAS Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

Rahul Gandhi | ‘ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती’; राहुल गांधींची सावरकरांवर पुन्हा टीका

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत