Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएनेच नाले, ओढ्यांवर बांधकाम परवानग्या दिल्याने; समाविष्ट गावांमध्ये ‘पूरस्थिती’ची परिस्थिती ! ; महापालिकेच्या पत्रानंतरही पीएमआरडीए कडून दोन वर्षात कुठलिच कारवाई नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएने समाविष्ट ११ गावांमध्ये परवानगी दिलेल्या बांधकामांमुळे शहराच्या विविध भागातील नाल्यांच्या प्रवाहामध्ये अडथळे आले आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये ही बाब उघडकीस आल्यानंतर महापालिकेने पीएमआरडीएला (Pune PMC-PMRDA) पत्र पाठवून कळविले होते. त्यानंतरही कुठलिच कार्यवाही करण्यात न आल्याचा फटका रविवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये या गावांतील नागरिकांना बसला आहे.

 

राज्यातील पुर्वीच्या भाजप- युती शासनाने पीएमआरडीएची (Pune PMC-PMRDA) स्थापना केली. पीएमआरडीएच्या दोन्ही महापालिका व कॅन्टोंन्मेट बोर्ड वगळता सुमारे ७ हजार चौ.कि.मी. परिसरात बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडेच आहेत. दरम्यान २०१८ मध्ये ११ गावांचा समावेश पुणे महापालिकेत झाला. तसेच दीड वर्षांपुर्वी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीए कडेच आहेत. यामध्ये सर्वाधिक गतीने विकसित होणार्‍या बावधन, लोहगाव, उंड्री पिसोळी, वाघोली या मोठ्या गावांचाही समावेश आहे.

 

दरम्यान, सप्टेंबर २०१९ मध्ये ढगफुटी सदृश्या पावसानंतर यापैकी बहुतांश ठिकाणी घरे, इमारतींमध्ये पाणी घुसले होते. सिमाभिंत पडून, रस्ते जलमय होउन मोठी हानी झाली होती. महापालिकेने प्रायमूव्ह संस्थेकडून सर्वेक्षण केल्यानंतर समाविष्ट ११ गावांमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम करताना नाल्यांचे प्रवाह बदलल्याने, काही ठिकाणी अतिक्रमण केल्याने ही परिस्थिती उदभवल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे यापैकी अनेक बांधकामांना पीएमआरडीएने परवानगी दिली आहे. महापालिकेने नाल्यावरील अतिक्रमण केलेल्या बांधकामांची यादीच पीएमआरडीएला पाठवून संबधितांवर कारवाई करावी असे पत्रही दिले. मात्र, पत्र दिल्यानंतरही दोन वर्षात पीएमआरडीएने कुठलिच कारवाई केलेली नाही.

पीएमआरडीए (Pune PMC-PMRDA) स्थापन झाल्यापासून महेश झगडे, किरण गित्ते, विक्रम कुमार,
सुहास दिवसे आणि नुकतेच रुजू झालेले राहुल महिवाल हे काम पाहात आहेत.
महापालिकेने २००९ मध्ये प्रायमूव्ह या संस्थेकडून शहरातील नाले ओढ्यांचा सविस्तर अहवाल तयार करून घेतला आहे.
बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देताना, ड्रेनेज अथवा पावसाळी गटारे व सार्वजनिक प्रकल्पांना मान्यता देतानाही या अहवालाचाही वापर करण्यात येतो.
परंतू यानंतर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांचा असा कुठलाच सर्वे झालेला नाही.
हा सर्वे नसल्यामुळे केवळ गाव नकाशांवरील वरवरच्या नोंदींवरूनच पीएमआरडीए बांधकाम परवानग्या देत आहे.
त्यामुळे बावधन, लोहगाव, वाघोली, उंड्री, पिसोळी सारख्या भागांमधील नाले,
ओढ्यांच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या पावसांत पुरासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC-PMRDA | As PMRDA itself gives construction permits on drains, streams; The situation of ‘flood condition’ in the included villages! ; Even after the letter from the Municipal Corporation, no action has been taken by PMRDA in two years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Maharashtra Rains | शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार

 

Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची सरकारवर टीका, फडणवीस रशिया दौऱ्यावर, अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला