Pune PMC Property Tax | ‘पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी’ ! भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक – मुरलीधर मोहोळ
मुंबई/पुणे : Pune PMC Property Tax | पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या (Pune BJP) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांसदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली. (Pune PMC Property Tax)
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी महापौर मोहोळ यांच्यासमवेत यावेळी आ. माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आ. भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), आ. सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) उपस्थित होते.
मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या या निवदेनातून करण्यात आल्या आहेत. (Pune PMC Property Tax)
या संदर्भात माहिती देताना माजी महापौर मोहोळ म्हणाले, ‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’.
महारापालिकेच्या २०१९ आणि २०२२ च्या ठरावाच्या आधारावर राज्य सरकारकडे या मागण्या केल्या असून
याबाबत तातडीने पुढील आठवड्यातच बैठक घेऊन याबाबत पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, हा विश्वास आहे, असेही मोहोळ म्हणाले.
महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन केवळ नौटंकी – मोहोळ
आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग
आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली.
स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत,
अशा शब्दात मोहोळ यांनी उत्तर दिले.
Web Title : Pune PMC Property Tax | ’40 percent Property tax discount of Pune taxpayers should be maintained’! The BJP delegation met the Chief Minister and Deputy Chief Minister
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra BJP | भाजपमध्ये लवकरच मोठे बदल, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; पुणे शहराध्यक्ष बदलणार?