Pune PMC Property Tax | 40 टक्के मिळकत करात सवलत घेताना 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज (PT 13) बंधनकारक ! खोटी माहिती देणारे सवलतीला मुकणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | राज्य शासनाच्या (Maharashtra State Govt) आदेशानुसार पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) मिळकत करातील ४० टक्के कर सवलत पुर्ववत करण्यात आली असून येत्या १५ मे पासून सुधारीत बिलांचे वाटप करण्यात येणार आहे. परंतू ही सवलत घेणार्‍या मिळकतधारकांनी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत स्वत: मिळकत धारकच संबधित मिळकतीत राहात असल्याचा अर्ज (पीटी ३ छापील अर्ज), पुराव्यांसह कर आकारणी व संकलन विभागाकडे सादर करायचा आहे. या अर्जानुसार महापालिकेचे अधिकारी तपासणी करणार असून या अर्जात खोटी माहीती दिल्यास संबधितांना मिळकत करामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune PMC Property Tax)

 

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की राज्य शासनाच्या आदेशानुसार पुण्यातील मिळकत धारकांना २०१८ मध्ये रद्द करण्यात आलेली ४० टक्के कर सवलत पुन्हा लागू करण्यात आली आहे. ही सवलत २०१९ पासून असणार आहे. यासोबतच १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या निवासी व बिगरनिवासी मिळकतींना देखभाल दुरूस्ती करिता देण्यात येणारी १५ टक्के वजावट रद्द करून १० टक्के देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी मात्र १ एप्रिल २०२३ पासून देण्यात येणार आहे. (Pune PMC Property Tax)

 

महापालिकेने १ एप्रिल २०१९ पासून आकारणी झालेल्या सुमारे एक लाख मिळकतींना ४० टक्के सवलत रद्द करून १०० टक्के कर आकारणी केलेली आहे. तसेच जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत ज्या जुन्या मिळकतींची सवलत २०१९ पासून रद्द करण्यात आली होती, अशा सुमारे ६५ हजार मिळकतींना ४० टक्के सवलत रद्द करूनच शंभर टक्के रकमेची बिले पाठवून कर वसुल करण्यात आला आहे. या मिळकतींची २०२३-२४ या वर्षीची बिले ३१ मे पर्यंत बनविण्यात येणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पहिल्या दोन महिन्यांत बिले भरणार्‍यांना बिलांमधील सर्वसाधारण करामध्ये ५ ते १० टक्के सूट देण्यात येते, ती सवलत यावेळी ३१जुलैपर्यंत राहाणार आहे.

 

मागील चार वर्षात १०० टक्के प्रमाणे कर भरलेल्या मिळकत धारकांनी ते स्वत: मिळकतीमध्ये राहात असल्याचा अर्ज (पीटी ३ फॉर्म) १५ नोव्हेंबर २०२३ पुर्वी महापालिकेकडे जमा करायचा आहे. या अर्जासोबत ते स्वत: या पत्त्यावर राहात असलेले पुरावे सादर करायचे आहेत. हे अर्ज महापालिका भवन येथील मुख्य कार्यालयात उपलब्ध करून दिले जाणार असून त्याच ठिकाणी जमा केले जातील. १५ नोव्हेंबरनंतर येणार्‍या अर्जांचा सवलतीसाठी विचार केला जाणार नाही. अर्ज मिळाल्यानंतर मिळकतींची व कागदपत्रांची कर निरीक्षकांच्या मार्फतीने तपासणी करण्यात येणार आहे. खोटी माहीती दील्यास कुठलिही कर सवलत लागू होणार नाही.

 

– अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग (Ajit Deshmukh, Deputy Commissioner, Taxation and Tax Collection Department)

 

चार टप्प्यात वजावट

ज्या मिळकत धारकांनी मागील चार वर्षे १०० टक्के कर भरला आहे,
त्यांना ४० टक्के सवलतीचा लाभ हा पुढील चार आर्थिक वर्षामधील मिळकत करांच्या बिलांमध्ये चार टप्प्यात देण्यात येणार आहे.

 

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त.

 

मिळकत कराचे उत्पन्न वाढावे यासाठी महापालिकेने नियमीत करदात्यांसाठी यावर्षी अनोखी बक्षिस योजना आणली आहे.
या योजनेअंतर्गत नियमीत कर दात्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त (Vikram Kumar, Pune Municipal Commissioner)

 

Web Title :- Pune PMC Property Tax | Application till November 15 (PT 13) is mandatory for getting 40 percent income tax discount! Those giving false information will lose the discount

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Solapur Pune Highway Accident | दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या 3 मित्रांचा अपघातात मृत्यू, सोलापुर-पुणे महामार्गावरील घटना