Pune PMC Property Tax – Building Development | पुणे महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाची कोटींची उड्डाणे ! बांधकाम विभागाचे उत्पन्न 1563 कोटी तर मिळकत कराचे 1 हजार 964 कोटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax – Building Development | महापालिकेचा बांधकाम विभाग आणि मिळकत कर विभागाने चालू आर्थिक वर्षामध्ये कुठल्याही योजनांशिवाय अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दीष्ट गाठले आहे. यावर्षी बांधकाम विभागाला अंदाजित उत्पन्नापेक्षा १६३ कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे. तर मिळकत कर विभागानेही यावर्षी सुमारे ६५ हजार नवीन मिळकती आकारणीखाली आणतानाच मागीलवर्षीच्या तुलनेत तब्बल १२५ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविले आहे. (Pune PMC Property Tax – Building Development)

 

कोरोना काळातही प्रामाणिकपणे महापालिकेचा कर भरणार्‍या पुणेकरांनी यावेळी सातत्य राखले आहे. मिळकत करातील ४० टक्के सवलत रद्द झाल्यानंतर आलेल्या वाढीव बिलांचा भरणा करू नये, असे जाहीर केल्यानंतरही पुणेकरांनी तब्बल १ हजार ९६४ कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. मागील आर्थीक वर्षात (२०२१-२२) स्थायी समितीच्या माध्यमातून थकबाकीदारांसाठी दोन वेळा ऍमनिस्टी योजना राबविण्यात आली होती. त्यावेळी १ हजार ८४० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षात प्रशासक राज असताना महापालिका प्रशासनाने तब्बल ६४ हजार नवीन मिळकतींची कर आकारणी केली. यातून महापालिकेला सुमारे ४०४ कोटी रुपये कर मिळाला.

यासोबतच मिळकत कर विभागाच्या अधिकार्‍यांनी ११ हजारांहून अधिक कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून काढत त्यांची आकारणी केली. साईड मार्जीनचा वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायीकांकडूनही या जागेची कर आकारणी करण्यात आली, त्यामधून १३ कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. आज अखेरच्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत ४१ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले, अशी माहिती कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांनी दिली. (Pune PMC Property Tax – Building Development)

 

महापालिकेच्या बांधकाम विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ हजार ४०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते.
परंतू प्रत्यक्षात १ हजार ५६३ कोटी रुपये मिळाले आहे.
दोन वर्षांपुर्वी कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने राज्य शासनाने बांधकाम प्रिमियम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत दिल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार ९५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
यंदा मात्र अशी कुठलिही सवलत नसताना अंदाजापेक्षा १६३ कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.
विशेष असे की समाविष्ट गावांतील बांधकाम परवानग्या पीएमआरडीएकडून दिल्या जात असून अद्याप महापालिकेला यातून कुठलेही उत्पन्न मिळत नाही.
समाविष्ट गावातील बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेला मिळावेत, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हे अधिकार महापालिकेकडे येतील.
त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न आगामी काळात वाढेल,
असा विश्‍वास शहर अभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare) यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Pune PMC Property Tax – Building Development | Construction and Income Tax Department of Pune Municipal Corporation flights of crores! The income of construction department is 1563 crores and income tax is 1 thousand 964 crores

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amba Mahotsav Pune 2023 | ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव’ 1 एप्रिलपासून

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह

 

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न