Pune PMC Property Tax | पुणेकरांना 40 टक्के मिळकत कर सवलत पुन्हा लागू करा; विधी मंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांचे आंदोलन

पुणे : Pune PMC Property Tax | पुण्यातील मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा आणि मिळकतींवरील शास्ती कर रद्द करावा यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने विधी मंडळाच्या पायऱ्यांवर बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. तसेच या मागणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लेखी निवेदन देण्यात आले. (Pune PMC Property Tax)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre), हडपसरचे आमदार चेतन तूपे (MLA Chetan Tupe) यांनी हे आंदोलन केले. शहरातील नागरिकांना पानशेत पूर दुर्घटनेपासून स्वतःच्या निवासी मिळकतीत 40 टक्के ही सवलत दिली जात होती. मात्र, महापालिकेने 2018 पासूनची सवलती पोटीची रक्कम वसूल करण्यासाठी आता नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस बजाविण्यास सुरवात केली आहे. आधीच बंद करण्यात आलेली सवलत आणि त्यावर थकीत रकमेचा बोजा यामुळे करदात्या पुणेकरांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे मिळकत करातील ही 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी अशी मागणी आमदार टिंगरे आणि तुपे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली. (Pune PMC Property Tax)

तसेच पुणे महापालिकेकडून अनधिकृत निवासी मिळकतींना दीडपट तर व्यावसायिक मिळकतींना तीनपट इतका
दंड (शास्ती) आकारला जात आहे. ही दंडाची ही रक्कम अतिशय अवास्तव आहे.
ज्याप्रमाणे राज्य सरकारने पिंपरी चिंचवड (Pimpri Chindhwad) शहरातील शास्ती कर रद्द करण्याचा
निर्णय घेतला आहे, त्यानुसार पुण्यातील मिळकतींचा शास्ती कर रद्द करावा अशीही मागणी या दोन्ही आमदारांनी
केली. दरम्यान या मागणीनंतर आमदार टिंगरे यांच्यासह शिरूरचे आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar)
, पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या मागणीचे निवेदन दिले.

Web Title : Pune PMC Property Tax | Demand for reintroduction of 40 percent exemption in income tax to Pune residents and abolition of penalty tax; Movement of the Mahavikas Aghadi on the steps of the Legislative Council

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु, आता त्यांनी…’, महिलादिनी राज ठाकरेंनी केलं ‘हे’ आवाहन

  Pune Crime News | वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देवून 30 लाखांची खंडणी मागणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Satara Crime News | अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करुन अर्भकाचे शीर केले धडावेगळे; पिडित मुलीच्या बापासह अत्याचार करणाराही गजाआड