Pune PMC Property Tax | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार, अनधिकृत बांधकामासाठी मिळकत करामध्ये आकारण्यात येणारी तीन पट शास्ति रद्द करण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेकडून मिळकत करातून देण्यात येणारी 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी याबाबत विधानसभेच्या पायर्‍यांवर आंदोलन केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) आणि चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला होता. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), सिद्धार्थ शिरोळे (MlA Siddharth Shirole), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले होते. त्यावेळी या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune PMC Property Tax)

अनधिकृत बांधकामासाठी मिळकत करामध्ये आकारण्यात येणारी तीन पट शास्ति रद्द करण्यात येणार आहे.

 

घरमालक राहत असलेल्या मिळकतींना पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC)
देऊ केलेली, मात्र सन 2018 मध्ये बंद करण्यात आलेली मिळकत करातील 40 टक्के
(Pune PMC Property Tax) सवलत पुन्हा लागू करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात आली होती.
या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत पुणेकरांना मिळकत करामध्ये मिळणारी 40 टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच येणाऱ्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) हा प्रस्ताव आणून त्याला मान्यता देण्यात
येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी मिळकत कराची 40 टक्के सूट काढून घेतली होती.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे,
मुरलीधर मोहोळ, नाना भानगिरे, योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि
उपायुक्त अजित देशमुख उपस्थित होते.

‘पोलीसनामा’ने सातत्याने हे प्रकरण लावून धरले होते, त्याला यश आले.

 

Web Title :-  Pune PMC Property Tax | Good news for Pune residents, 40 percent income tax exemption will continue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे तर ‘मख्खमंत्री’ बसलाय, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ST Bus News | एसटीच्या भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत, आजपासून नवे नियम लागू

Ajit Pawar | दुधात भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अजित पवारांची विधानसभेत मागणी (व्हिडिओ)