Pune PMC Property Tax News | आता मिळकत कर थकबाकीदारांकडे महापालिकेचा मोर्चा ! मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणार, चेंज ऑफ युज केलेल्यांची व्यावसायीकांची आकारणी करणार

मे महिन्यापासूनच व्यापक मोहीम सुरू : विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax News | राज्य शासनाच्या आदेशानुसार मिळकत करातील ४० टक्के सवलत पूर्ववत केल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत महापालिकेचे उत्पन्न १५० ते २०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने तब्बल ९ हजार कोटी रुपयांची मिळकत कर थकबाकी वसुल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करणे आणि वापरात बदल केलेल्या व्यावसायीक मिळकतींची आकारणी व वसुली करण्यावर भर देण्यात येईल. यासाठी मिळकत कर विभागाला अधिकचे मनुष्यबळ व योग्य ती साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहीती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Property Tax News)

राज्य शासनाने मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत केल्याने महापालिकेचे उत्पन्न घटणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेला मिळकत करातून मिळणारे थेट उत्पन्न वाढविण्याकडे प्रशासनाने मोर्चा वळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीदारांकडून थकबाकी वसुल करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहेत. तसेच निवासी मिळकतींचा व्यावसायीक वापर करणार्‍यांची व्यावसायीक दराने आकारणी करण्यासाठी देखिल नियोजन केले आहे, अशी माहीती विक्रम कुमार यांनी दिली. (Pune PMC Property Tax News)

महापालिकेची मिळकत कराची थकबाकी ९ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये कराची मागणी ३ हजार ३० कोटी रुपयांची असून ६ हजारांहून अधिक उर्वरीत रक्कम तीनपट शास्ती आणि दंडाची रक्कम आहे. यामध्ये २७०० मोबाईल टॉवरची सुमारे २२०० कोटी रुपये थकबाकी आहे. हा वाद न्यायालयात आहे. शासनाच्या कार्यालयांची १०६ कोटी रुपये, न्यायालयीन वादातील मिळकतींची सुमारे ८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच ४ हजार ४०० मिळकतींची दुबार नोंद झालेली आहे. न्यायालयीन वादात असलेल्या ७०० खटल्यांमध्ये एक वर्षांहून अधिक काळापासून स्थगिती आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी आणि केसेस निकालात काढाव्यात यासाठी विशेष जिल्हा न्यायाधीशांना विनंती करण्यात येणार आहे.

 

प्रामुख्याने न्यायालयात कुठलाही वाद नसताना मोठ्याप्रमाणावर थकबाकी असलेल्या सुमारे १२ हजार ५०० मिळकतींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यापैकी बहुतांश मिळकती या व्यावसायीक आहेत. या मिळकतींना वेळोवेळी नोटीस देखिल बजावण्यात आल्या असून लवकरच त्या सील करून लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. मागीलवर्षी तब्बल २५०० मिळकती सील केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे १८० कोटी रुपये थकबाकी वसुल करण्यात यश आले आहे. यावर्षी ही कारवाई अधिक गतीने आणि व्यापक स्वरूपात करण्यात येईल. यासाठी आवश्यक मनुष्यबळ देखिल मिळकत कर विभागाला उपलब्ध करून देण्यात येईल, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

४० टक्के सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म फक्त ‘त्यांनीच’ भरून द्यायचा आहे…..

महापालिकेने २०१९ पासून नवीन कर आकारणी केलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत काढून घेतली आहे.
तसेच जीआयएस मॅपिंग सर्व्हेमध्ये ज्या जुन्या मिळकतींची आकारणी झाली त्यांची ही सवलत काढून घेतली आहे. अशा साधारण १ लाख ६५ हजार मिळकत धारकांना २०१९ पासून पुन्हा ४० टक्के सवलत देण्यात येणार आहे. केवळ याच मिळकत धारकांनी पीटी ३ फॉर्म भरुन दयायचा आहे.

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

 

Web Title :-  Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation’s march to the income tax arrears!
Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Water Supply News | पुण्यात 18 मे पासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहाणार !
पावसाळा लांबण्याचा अंदाज असल्याने महापालिकेचा निर्णय

Maharashtra Politics News | …तेव्हा भूजबळ, खडसेंना खोके दिले होते का?, शिंदे गटाचा शरद पवारांवर हल्लाबोल

Shambhuraj Desai | अजित पवारांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले – ’70 हजार कोटी खर्च करुनही…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7
जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल