Pune Pmc Property Tax | स्वत: वापरत असलेल्या मिळकतीची थकबाकी नसल्यास केवळ 2023-24 या वर्षाचा मिळकत कर भरावा

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे पुणेकरांना आवाहन ! नागरिकांच्या शंकांचे निरसन करा - उपायुक्त अजित देशमुख यांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pmc Property Tax | मिळकत करातील ४० टक्के सवलतीनंतरही बिलांमध्ये थकबाकी दाखविल्याने पुणेकरांना गेली काही दिवस मनस्ताप सोसावा लागला. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने (Pune PMC Administration) स्वत: राहात असलेल्या आणि मागील थकबाकी नसलेल्या मिळकत धारकांनी केवळ चालू वर्षीचे (२०२३-२४) बील भरावे. यासोबतच पीटी ३ फॉर्म भरून द्यावा (PT 3 Form PMC Pune) , जेणेकरून बिलांमध्ये दिसणारी थकबाकी दिसणार नाही, असे स्पष्टीकरण केले आहे. कर विभागाकडील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक घेउन ही बाब बिल भरण्यासाठी अथवा तक्रार करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना समजावून सांगावी, अशी सूचनाही केली आहे. (Pune Pmc Property Tax)

 

महापालिकेने ४० टक्के मिळकत कर सवलत पूर्ववत सुरू केली आहे. प्रामुख्याने २०१९ नंतर आकारणी झालेल्या आणि जीआयएस सर्वेक्षणामध्ये ज्यांची सवलत काढून घेण्यात आली अशा सुमारे चार लाख मिळकतींच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षीच्या मिळकत करामध्ये ४० टक्के रक्कम कमी झाली आहे. परंतू प्रत्यक्षात बिल हातात पडल्यानंतर ज्यांनी मागीलवर्षी पर्यंतचा कर भरला असतानाही मागील चार वर्षांचे ४० टक्क्यांनी ऍरीअर्स बिलांमध्ये दिसत आहेत. काही कर भरणा केंद्रांवर कर्मचारी देखिल सर्व रक्कम भरण्यासाठी आग्रह करत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येउ लागल्यानंतर कर आकारणी विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Taxation Department Head Ajit Deshmukh) यांनी कर विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेउन खास सूचना दिल्या आहेत. यामुळे यापुढे नागरिकांचे शंका निरसन होईल, अशी अपेक्षा आहे. (Pune Pmc Property Tax)

 

अजित देशमुख यांनी नागरिकांसाठी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे :

२०१९ नंतर आकारणी झालेल्या बिलांमध्ये २०२३-२४ वर्षीच्या बिलात करपात्र रकमेत ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. मिळकतीचा वापर स्वत: करत असल्यास पीटी ३ फॉर्म १५ नोव्हेंबर पयर्र्ंत जमा करावा.

२०२२-२३ पर्यंत सर्व कर भरल्यानंतरही बिलांमध्ये २०१९ पासूनची ४० टक्क्यांनुसार थकबाकीची रक्कम दिसत असल्यास थकबाकीची रक्कम भरू नये. केवळ चालू वर्षीचे बिल भरावे.

जीआयएस सर्वे अंतर्गत १ एप्रिल २०१८ पासून ज्या जुन्या मिळकतींची सवलत काढून घेतली आहे. त्यांनाही फरकाच्या रकमेच्या बिलांसह चालू वर्षीचे बिल पाठविले आहे. त्या मिळकत धारकांनी देखिल स्वत: राहात असल्यास पीटी ३ फॉर्म भरून द्यावा व फक्त चालू वर्षीचे बिल भरावे.

परंतू स्वत: राहात नसल्यास (भाडेकरू) चार वर्षांच्या ऍरीअर्ससह (थकबाकी) सर्व बिल भरणे बंधनकारक राहाणार आहे. भाडेकरू असलेल्या मिळकतींचे पीटी ३ फॉर्म भरून घेतले जाणार नाहीत.

पीटी ३ फॉर्मसोबत सोसायटीच्या चेअरमनचे पत्र बंधनकारक नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या पत्रासाठी मिळकतधारकांना वेठीस धरू नये.

पुरावे म्हणून रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, सोसायटीचे नाहरकत
पत्र यापैकी कुठलीही दोन कागदपत्र जोडावीत. ज्यांच्या नावे शहरात दोन मिळकती आहेत, त्यांनी दुसर्‍या मिळकतीची कर पावती जोडावी.

१५ नोव्हेंबरपर्यंत पीटी ३ फॉर्म स्वीकारण्यात येणार आहेत. या मुदतीत फॉर्म न देणार्‍या मिळकतधारकांना
तेथे भाडेकरू ठेवण्यात आल्याचे समजून १०० टक्के कर आकारणीसोबतच मागील सर्व थकबाकी भरून घेण्यात येणार आहे.

पीटी३ फॉर्म नुसार सर्व मिळकतींचे अधिकारी व कर्मचार्‍यांमार्फत सर्वेक्षण केले जाणार असून
त्यानंतर बिलांवरील थकबाकी (ऍरीअर्स) दिसणार नाही.

मागील चार वर्षे संपुर्ण कर भरलेल्या मिळकत धारकांना पुढील चार बिलांमध्ये चार टप्प्यात वजावट देण्यात येईल.

 

 

Web Title :  Pune PMC Property Tax | Property tax for the year 2023-24 only if there is no
arrears of self use income Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा