Pune PMC Property Tax | मिळकत करातून पुणे महापालिका मालामाल ! पहिल्या दोन महिन्यात जामा झाले तब्बल 939 कोटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेला 2022-23 या आथिक वर्षात पहिल्या दोन महिन्यातच मिळकत करातून (Pune PMC Property Tax) तब्बल 939 कोटी 89 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आता पर्यंतच्या इतिहासात हे सर्वाधिक उत्पन्न आहे. पहिल्या दोन महिन्यात मिळकत कर (Property Tax) भरणाऱ्या मिळकतधारकांना सर्वसाधारण करामध्ये 5 टक्के सवलत दिली जाते. ही मुदत 31 मे रोजी संपली असून नागरिकांना कर भरण्यासाठी शनिवार आणि रविवार देखील सीएफसी सेंटर्स (CFC Centers) सुरु ठेवण्यात आले होते.

 

31 मे पर्यंत कर भरणा केल्यास सर्वसाधरण करा मध्ये 5 टक्के सवलत देण्यात येते. यापैकी निम्म्याहून अधिक कर हा ऑनलाइन (Property Tax Online Payment) भरण्यात आला आहे. तसेच काल अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कर भरण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. लोड आल्याने सर्व्हर बंद पडल्याने अखेर अनेकांनी रांगा लावून सिएफसी केंद्रावर रोखीने कर भरणा केला.

 

पुणे महापालिकेतर्फे Pune Municipal Corporation (PMC) 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना सवलत दिली जाते.
या दोन महिन्यात मोठ्याप्रमाणात कर भरला जात असल्याने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेच्या गंगाजळीत मोठी रक्कम जमा होते.
यंदाच्या वर्षी महापालिकेने 2100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे या दोन महिन्यात मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे आहे.
मिळकतकराच्या सवलतीचा 31 मे शेवटचा दिवस होता. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच ऑनलाइन कर भरण्यावर भर दिला.

Web Title :-  Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation PMC Collects Property Tax of 939 crore in the first two months


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शारिरीक संबंधाचा व्हिडिओ काढून ‘गे’ असल्याची बदनामी करण्याची धमकी; 24 वर्षाच्या तरुणाकडून उकळली खंडणी

Pune PMC News | नियोजनाशिवाय उभारल्या जाणार्‍या व वापराशिवाय पडून राहाणार्‍या ‘वास्तु’ उभारणीस लागणार चाप

Pune Crime | ज्ञानवापी मशिदीतील वादात भाजपा महिला प्रवक्त्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ajit Pawar On Neelam Gorhe | ‘निलमताई, तुमच्यासाठी थांबलो होतो, पण परबांनी ऐकलं नाही; तुम्ही शिवसेनावाल्यांनी आपापलं बघून घ्यावं’ – अजित पवार

Krishnakumar Kunnath – Singer KK | प्रसिद्ध गायक केके यांचे 53 व्या वर्षी निधन