Pune PMC Property Tax | 40 टक्के कर सवलतीचा निर्णय मंत्री मंडळापुढे प्रलंबित ! 2023-24 या आर्थीक वर्षाची बिलांचे 1 मे नंतर वाटप

40 टक्के कर सवलत रद्द झालेल्यांनाही थकबाकी भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ : विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | राज्य शासनाने मिळकत करामध्ये ४० टक्के सूट देण्याचा निर्णय अद्यापही न घेतल्याने महापालिकेने पुढील आर्थीक वर्षातील (२०२३-२४) मिळकत कराची बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ४० टक्के सवलत काढण्यात आल्यानंतर आकारणी झालेल्या मिळकतींची बिले भरण्यासही ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे एप्रिल महिन्यात या थकबाकीदारांवर कुठल्याही दंडाची आकारणी केली जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Property Tax)

 

महापालिकेचे पुढील आर्थीक वर्ष एक एप्रिल पासून सुरू होत आहे. दरवर्षी महापालिका अगदी पहिल्या तारखेपासूनच मिळकत करांची बिले पाठविण्यास सुरूवात करते. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशावरून २०१९ पासून मिळकत करामध्ये १९६९ पासून देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २०१९ पासून नवीन आकारणी झालेल्या सुमारे १ लाख ६५ हजार मिळकतींना शंभर टक्के दराने कर आकारणी होत आहे. तसेच त्या पुर्वी आकारणी झालेल्या मिळकतींकडूनही ४० टक्क्यांची सवलत रद्द करूनच आकारणी केली जात आहे. यामुळे शहरातील हजारो मिळकतधारकांना सवलतीच्या थकबाकीसह मोठ्या रकमांची बिले आली आहेत. यावरून नागरीकांकडून रोष व्यक्त करण्यात आल्यानंतर सप्टेंबरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नागरिकांनी ही बिले भरू नयेत, असे आवाहन केले होते. (Pune PMC Property Tax)

दरम्यान कसबा पोट निवडणुकीनंतर (Pune Kasba Bypoll Election) नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्यासह महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) आमदार तसेच भाजपच्या आमदारांनीही ४० टक्के करसवलतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ४० टक्के कर सवलत पुर्ववत करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. उद्या १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून अद्याप मंत्री मंडळाचा निर्णय न झाल्याने महापालिकेची अडचण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील काही दिवसांत मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल, अशी शक्यता गृहीत धरून महापालिकेने आगामी वर्षांच्या बिलांचे वाटप १ मेपासून करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

यासंदर्भात माहीती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikarm Kumar PMC) यांनी सांगितले,
की राज्य शासनाचा निर्णय झाल्यानंतर दुरूस्तीसह नागरिकांना बिले द्यावी लागतील,
अन्यथा मोठ्याप्रमाणावर गोंधळ होईल. राज्य शासन ४० टक्के करसवलत केंव्हापासून करणार यावरही नवीन बिलांची छपाई अवलंबून आहे.
त्यामुळे तूर्तास तरी १ मे पासून पुढील वर्षाची बिलांच्या वाटपाचे नियोजन केले आहे.
तसेच महापालिका ३१ मे पर्यंत मिळकत कर भरणार्‍यांना सर्वसाधारण करामध्ये ५ टक्के सवलत देते.
याची मुदतही ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. ४० टक्के सवलत काढल्यामुळे ज्या मिळकत धारकांना अधिकची बिले आली आहेत
व ज्यांनी ती भरलेली नाहीत, त्यानांही ही बिले भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 

Web Title :-  Pune PMC Property Tax | The decision of 40 percent tax relief is pending before the Cabinet! Allotment of bills for the financial year 2023-24 after May 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amba Mahotsav Pune 2023 | ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव’ 1 एप्रिलपासून

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह

 

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न