Pune PMC Recruitments 2023 | पुणे महापालिकेत ३४० पदांची भरती प्रक्रिया सुरू; फायरमनसह आरोग्य विभागात मोठी संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Recruitments 2023 | पुणे महापालिकेच्या तिसर्‍या टप्प्यातील भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होत आहे. अग्निशामक दलासाठी २०० पदे, निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांची २० पदे, आरोग्य निरीक्षकांच्या ४० पदांसह, आरोग्य विभाग, वाहन विभागातील विविध विभागातील तब्बल ३४० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे (Pune PMC Recruitments 2023). मागील काही महिन्यांपुर्वी झालेल्या भरती प्रक्रियेप्रमाणेच आयबीपीएस या संस्थेमार्फत लेखी परीक्षा घेउनच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation Recruitment 2023)

राज्य शासनाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने मागीलवर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, लिपिक पदाच्या तब्बल ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या बहुतांश उमेदवारांची कागदपत्र तपासणीनंतर नियुक्ती देखिल करण्यात आली होती. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आणखी काही विभागातील प्रामुख्याने अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभागाचे उपायुक्त सचिन इथापे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रोस्टर तपासणी करून तब्बल ३४० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्त विक्रम कुमार यांनी या मान्यतेनंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. (Pune PMC Recruitments 2023)

या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच या पदांच्या भरतीची जबाबदारी देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
यासाठी ऑनलाईन परिक्षा होणार असून सामान्य ज्ञान, इंग्रजी,
मराठी व बुद्धमता चाचणी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे
असणारी प्रश्‍नपत्रिका राहाणार आहे.

ही पदे भरली जाणार

*क्ष किरण तज्ञ (८), वैद्यकीय अधिकाी (२०), उप संचालक, प्राणी संग्रहालय (१),
पशु वैद्यकीय अधिकारी (२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०),
कनिष्ठ अभियंता, विद्युत (१०), आरोग्य निरीक्षक (४०), वाहन निरीक्षक (३), औषध निर्माता (१५), पशुधन पर्यवेक्षक (१), अग्निशामक दल, फायरमन (२००)

 

Web Title :-  Pune PMC Recruitment 2023 | Recruitment process for 340 posts in Pune Municipal Corporation started; Great opportunity in health department with Fireman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय;
महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव

Pune Crime News | बोपदेव घाटात जोडप्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक; 2 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड

Pune Crime News | येरवडा बालसुधार गृहातून फरार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात