Pune PMC Recruitment | ‘गावांच्या समावेशामुळे महापालिका इंजिनिअर व अन्य संवर्गातील पदांची संख्या वाढवणार’ – मनपा आयुक्त विक्रम कुमार

‘लवकरच अग्निशामक दल, डॉक्टर, आरोग्य निरीक्षकांसह अन्य ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणार’

 

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune PMC Recruitment | महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश झाल्याने अभियंत्यांसह अन्य काही सवर्ंगातील पदांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासंदर्भात शासनाकडे लवकरच पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच लवकरच अग्निशामक दल, डॉक्टर, आरोग्य निरीक्षक, इलेक्ट्रीकल इंजिनिअरसह अन्य काही सवर्ंगातील साधारण ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Recruitment)

 

महापालिकेमध्ये नुकतेच ४०० हून अधिक पदांची भरती प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये इंजिनिअर, लिपिक, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहाय्यक अधिकारी आदी पदांचा समावेश होता. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्यानंतर प्रशासनाने उर्वरीत पदांच्या भरतीसाठी रोस्टर तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोस्टर तपासणी पूर्ण करून १० जानेवारीपर्यंत जाहीरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. (Pune PMC Recruitment)

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तेथील ग्राम पंचायतीमधील कर्मचार्‍यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येईल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. परंतू ग्रामपंचायतींमध्ये अभियंते व अन्य तत्सम पदे नसल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत या सवर्ंगातील पदे उपलब्ध व्हावीत, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार कोणत्या सवर्ंगातील पदांमध्ये वाढ करावी लागेल याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. हे करत असताना महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च हा वेतनावर होणार नाही याची दक्षता घेउनच संवर्गात पदांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येईल व त्यानुसारच शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे उपस्थित होते.

किशोरी शिंदे आणि युनूस पठाण यांना उपायुक्तपदी बढती
क्रिडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे (Kishori Shinde PMC) आणि
अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त युनूस पठाण (Yunus Pathan PMC)
यांची उपायुक्तपदी पदोन्नती करण्याचा निर्णय आज डीपीसीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
लवकरच स्थायी समितीच्या माध्यमातून यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल,
अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC Recruitment | ‘Due to the inclusion of villages, the number of posts in municipal engineers and other cadres will increase’ – Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…