Pune PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांची भरती, सरळसेवा पद्धतीने होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) 320 पदांसाठी भरती केली जाणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1. वर्ग 2 आणि वर्ग 3 मधील रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. सरळसेवा प्रवेशाने ही पदे भरण्यासाठी महापालिकेने जाहिरात (Pune Job) प्रसिद्ध केली आहे. ही पदे आरोग्य (Health), उद्यान (Park), अभियांत्रिकी (Engineering), तांत्रिक (Technical) व अग्निशमन (Fire Brigade) सेवेमधील आहेत. इच्छुक उमेदवारांनी 8 मार्च ते 28 मार्च पर्यंत अर्ज करायचा आहे. (Pune PMC Recruitment)

एकूण पदे 320

पुणे महापालिकेने दिलेल्या जाहिरातीनुसार, वर्ग -1 मध्ये 8 पदे, वर्ग 2 मध्ये 23 तर वर्ग 3 मध्ये 289 पदे अशी एकूण 320 पदांची भरती केली जाणार आहे. (Pune Municipal Corporation Recruitment)

रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुत व इतर आवश्यक अटी व शर्तींची माहिती पुणे महापालिकेच्या https://pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html या लिंकवर क्लिक करुन पाहता येईल. (Pune PMC Recruitment)

कोणत्या पदासाठी किती जागा

1. क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) श्रेणी – 1 – (8 पदे)
2. वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी (श्रेणी-2) (20 पदे)
3. उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधीक्षक (झू) (श्रेणी-2) (1 पद)
4. पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी-2) (2 पदे)
5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी-3) (20 पदे)
6. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी-3) (40 पदे)
7. कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी-3) (10 पदे)
8. वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी-3) (3 पदे)
9. मिश्रक/औषध निर्माता (श्रेणी-3) (15 पदे)
10. पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी-3) (1 पद)
11. अग्निशमक विमोचक/फायरमन (श्रेणी-3) (200 पदे)
पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

वेतनश्रेणी – पुणे महानगरपालिकेच्या 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे (7th Pay Commission)

1. क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 67,700 – 2,08,700
2. वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी – 56,100 – 1,77,500
3. उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधीक्षक (झू) – 49,100-1,55,800
4. पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी-2) – 41,800 -1,32,300
5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी-3) – 41,800 – 1,32,300
6. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी-3) – 35.400 – 1.12,400
7. कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी-3) – 38,600-1,22,800
8. वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी-3) – 35,400 -1,12,400
9. मिश्रक/औषध निर्माता (श्रेणी-3) -29,200 – 92,300
10. पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी-3) – 25,500 – 81,100
11. अग्निशमक विमोचक/फायरमन (श्रेणी-3) – 19,900-63,200

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1. क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी (क्ष-किरण शास्त्र) अथवा एम.बी.बी.एस., डी.एम.आर.डी. व डी.एम.आर.डी नंतरचा क्ष-किरण शास्त्र विषयातील किमीन 5 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडी, खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

2. वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी
मान्यता प्राप्त विद्यापीठीची वैद्यकीय पदवी (MBBS). शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव.

3. उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधीक्षक (झू)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम.व्ही.एस्सी उत्तीर्ण. प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा तीन वर्षाचा अनुभव.

4. पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी-2)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम.व्ही.एस्सी उत्तीर्ण. प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा तीन वर्षाचा अनुभव.

5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी-3)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान पाच वर्षांचा अनुभव. शास्त्र शाखेची पदवी धारकास प्राधान्य.

6. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी-3)
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. संबंधीत कामाचा पाच वर्षांचा अनुभव. शास्त्र शाखेची पदवी धारकास प्राधान्य

7. कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी-3)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी, पदविका अगर तत्सम पदवी, पदविका. अभियांत्रिकी कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

8. वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी-3)
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. ITI व NCTVT मोटार मॅकॅनिक किंवा DAE/DME कोर्स उत्तीर्ण. मोटार वाहन कायदा विषयी माहिती. पदविका धारकांना तीन तर अन्य उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

9. मिश्रक/औषध निर्माता (श्रेणी-3)
उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण. औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी.फार्म). औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारांना प्राधान्य. संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

10. पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी-3)
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. पशुधन संरक्षण कामाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

11. अग्निशमक विमोचक/फायरमन (श्रेणी-3)
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण असावे. मराठीचे ज्ञान आवश्यक.

शारीरिक पात्रता व वयोमर्यादा

उंची 165 से.मी. (महिलांसाठी 162 से.मी.), छाती साधारण 81 से.मी. फुगवून 5 से.मी. जास्त (महिलांसाठी लागू नाही). वजन 50 कि.ग्रॅ. दृष्टी चांगली.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 38 पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 पेक्षा अधिक नसावे.

निवड पद्धत

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक अर्हता आणि अनुभव किंवा अन्य योग्य निकश यांच्या आधारे निकष निश्चित करुन अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाईल. परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल अथा एस.एम.एस द्वारे कळवले जाईल. तसेच पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवाराला किमान 45 टक्के गुण प्राप्त करावे लागतील.

Web Title : Pune PMC Recruitment | Recruitment of 320 posts in Pune Municipal Corporation, recruitment will be through direct service; Know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु, आता त्यांनी…’, महिलादिनी राज ठाकरेंनी केलं ‘हे’ आवाहन

  Pune Crime News | वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देवून 30 लाखांची खंडणी मागणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Satara Crime News | अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करुन अर्भकाचे शीर केले धडावेगळे; पिडित मुलीच्या बापासह अत्याचार करणाराही गजाआड